computer

हातांनी रंगवलेल्या फोटोग्राफ्सना जपानी जनतेने डोक्यावर कसे घेतले? हाताने रंगवलेल्या फोटोग्राफ्सचे हे ८ नमुने पाहून घ्या!!

१८३९ साली फोटोग्राफीच्या जगताला जन्म देणाऱ्या डॅगरोटाईप पद्धतीचा जन्म झाला. कृष्णधवल रंगाची छायाचित्रे तयार होऊ लागली. तोपर्यंत चित्रकलेतूनच व्यक्ती, निसर्ग, इमारती इत्यादी गोष्टींना जपून ठेवलं जायचं. कालांतराने युरोपात ‘फोटोग्राफी’ स्थिरस्थावर झाली आणि त्यानंतर पुढची मागणी होऊ लागली. हि मागणी होती कलर फोटोग्राफची. रंगच नसल्यामुळे कितीही जिवंत चित्रे पाहायला मिळत असली तरी निराशाच होती. जेव्हा गरज असते तेव्हाच नवं काही जन्माला येतं त्याप्रमाणे एका बाजूला शास्त्रज्ञ कलर फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यात सुधार करत होते, तर दुसरीकडे हाताने रंगवलेल्या फोटोंचा जन्म होत होता. 

१८४० सालापासून युरोपात हाताने रंगवलेल्या फोटोंनी जोर धरायला सुरुवात झाली. साधारणपणे असे समजले जाते की, चार्ल्स विर्ग्मन आणि फोटोग्राफर फेलिस बिटो यांनी ह्या पद्धतीला जन्म दिला. पुढे काही संशोधने झाली आणि समजलं की ब्रिटीश फोटोग्राफर विल्ल्यम साउंडर्स याने पहिल्यांदा हाताने रंगवलेल्या फोटोंची कल्पना आणली होती. विल्ल्यम साउंडर्सने तयार केलेल्या १९६२ च्या जपान हेराल्ड वृत्तपत्रातल्या एका जाहिरातीवरून हे मत मांडण्यात आलं. जपान हेराल्डमध्ये ती जाहिरात देताना विल्ल्यम साउंडर्सलाही कल्पना नसेल की त्याने जी कल्पना शोधून काढली आहे ती जपानच्या संस्कृतीचा भाग बनणार आहे. पुढे जाऊन युरोपियन लोकांनी शोधलेली कल्पना जपानी नागरिकांनी उचलून धरली आणि जपानमध्ये हाताने रंगवलेल्या फोटोग्राफ्सचं नवीन पर्व सुरु झालं. 
 

फोटोग्राफी येण्यापूर्वी जपानी कलाकार ‘वाशी’ (washi) नावाच्या खास कागदावर चित्रे काढत आणि ती लाकडाच्या ठोकळ्याला चिकटवत. याला वूडब्लॉक पेंटिंग म्हटलं जातं. फोटोग्राफीचं तंत्रज्ञान आल्याने वूडब्लॉक पेंटिंगची मागणी कमी होऊ लागली. परिणामी हे कलाकार बेरोजगार झाले. पण फोटोग्राफीमध्ये येऊ घातलेली नवी संधी त्यांनी दवडली. त्यांना चित्रकारीतेतील ज्ञानाचा उपयोग फोटोग्राफ्स रंगवताना झाला. 

फोटोग्राफ्स हाताने रंगवताना युरोपात तैल रंग वापरले जायचे, पण जपानी कलाकारांनी पाण्यात सहज विरघळणाऱ्या रंगांची निवड केली. हे रंग तैल रंगांच्या मानाने जास्त पारदर्शी असत. याखेरीज रंगांसोबत खास buckskin glue नावाचा गोंद मिसळलेला असे. या कामाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांना रंग भरताना रंगांची निवड करण्याची सूटही मिळे, त्यामुळे फोटो रंगवण्याचं काम सरधोपट न राहता त्यात कलेचा शिरकाव झाला.

जपान मधल्या रंगवलेल्या फोटोग्राफ्सचा एवढा इतिहास जाणून घेतल्यावर आता आपण वळूया जपानच्या एका खास कलाकाराकडे ज्याने हा संपूर्ण काळ फक्त पाहिला नाही तर जगला. हा कलाकार म्हणजे शिनीची सुझुकी (१९३८-१९१८).

शिनीची सुझुकी यांनी The Far East या युरोपीय मासिकासाठी फोटोग्राफर म्हणून काम केलं होतं. या दरम्यान त्यांनी जे फोटोग्राफ्स घेतले ते जपानचं वेगळं दर्शन घडवतात. त्यांनी निवडलेले रंग, फोटोग्राफीची पद्धत, अस्सल जपान दाखवण्यासाठी केलेल्या गोष्टींची निवड हे सगळंच उत्तम कलेचा नमुना म्हणता येतील असे आहेत. 

सुझुकी यांचं खरं नाव होतं ओकामोटो केझो. त्यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि कलेचं शिक्षण घेण्यासाठी जपानच्या योकोहामा येथे आले. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेले फोटोग्राफर चार्ल्स विर्गमन यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं. 

१८७२ ते १९७३ सालात कधीतरी त्यांची भेट जे. आर. ब्लॅक यांच्याशी झाली. जे. आर. ब्लॅक हे The Far East मासिकाचे प्रकाशक होते. त्यांना आपल्या मासिकात जपानच्या ग्रामीण जीवनावर आधारित फोटो सिरीज प्रकाशित करायची होती. हे काम त्यांनी सुझुकी यांना देऊ केलं.

१८८० पर्यंत सुझुकी यांनी The Far East साठी फोटोग्राफी केली. १९१८ साली त्यांचा मृत्यू झाला तोवर जपानमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीने जम बसवला होता. सुझुकी यांनी टिपलेला जपान आणि १९०० च्या नंतरचा जपान यांच्यात बरीच दरी निर्माण झाली होती. त्यामुळे सुझुकी यांचे फोटो आजही जपानच्या गतकाळाची साक्ष देताना दिसतात. 

जाता जाता सुझुकी यांनी टिपलेले जपानच्या ग्रामीण आयुष्यातील क्षण पाहूया. हे फोटो हाताने रंगवलेले आहेत यावर क्षणभर विश्वास बसणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required