computer

जपानच्या बाजारात आलेत हायपररिअ‍ॅलिस्टिक 3D मास्क...फोटो पाहिले का?

कोरोना येऊन वर्ष होण्यात आले. या काळात आपण मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्डचे अनेक प्रकार येऊन गेले. त्यांच्यासोबत अनेक प्रयोग होताना देखील आपण बघितले. आता जपानच्या एका व्यक्तीने बनवलेला मास्क मात्र आजवरचा सर्वात वेगळा प्रयोग आहे.

त्याचे नाव आहे, shuhei okawara!! हे नाव मराठीत कसे उच्चारायचे हे कळत नसल्याने जसेच्या तसे लिहावे लागले आहे. याने थेट हायपररिअ‍ॅलिस्टिक 3D मास्क बनवला. हा मास्क कसा दिसतो याचा एक नमुना खाली पाहा.

आता मास्क म्हटलं की तो कोरोनापासून ते इतर सगळ्याच रोगांपासून माणसाचं संरक्षण करणार हे आपण गृहीतच धरलेलं असतं, पण हा मास्क वेगळा आहे. या मास्कमुळे तुम्हाला एखाद्या अनोळखी माणसाचा चेहरा आपल्या चेहऱ्यावर लावता येईल.  हायपररिअ‍ॅलिस्टिक 3D मास्क असल्याने तो खऱ्याखुऱ्या चेहऱ्यासारखाच वाटतो.  एका अर्थाने shuhei okawara ने मास्क नाही तर नवा चेहराच बनवला आहे.

मास्कसाठी चेहरा निवडण्यासाठी shuhei okawaraने १०० मॉडल्सकडून त्यांच्या चेहऱ्याचे फोटो मागवले होते. त्यातील काहींची निवड करून त्याने त्यांचा चेहरा 3D स्वरुपात छापून घेतला. यासाठी त्याने प्रत्येकी मॉडल्सना ४०,००० येन म्हणजे २८००० रुपये खर्च केलेत.

हे मास्क पुढच्या वर्षीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. एक मास्क जवळपास ७० हजार रुपये किमतीत विकले जाणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे हे मास्क फक्त okawara याच्या जपानमधील दुकानातच मिळणार आहेत.

आपल्या भारतात हा मास्क कधी येणार की नाही याबद्दल सांगता येणार नाही.  आलाच तर तुम्हाला अनोळखी भारतीयांचे चेहरे तुम्हाला घ्यायला आवडतील का?

 

 

आणखी वाचा:

बाब्बौ!! सोन्याचा मास्क? कुणी घेतला, किती तोळ्यांचा आणि कितीला पडला?

मास्क घालूनही चेहरा दिसेल? पाहा या फोटोग्राफरची आयडिया!!

सबस्क्राईब करा

* indicates required