दिनविशेष : आजच्या दिवशी या भारतीयाला मिळाले पहिले पायलट लायसन्स !!

एअर इंडियाचे संस्थापक “जे. आर. डी. टाटा” हे  पायलटचं लायसन्स मिळवणारे पहिले भारतीय होते. हा दिवस होता १० फेब्रुवारी, १९२९.

जे. आर. डी. टाटा हे भारतातल्या विमान वाहतूक व्यवसायाचे जनक होते. त्यांनी स्थापन केलेल्या एअर इंडियाची आजही उड्डाणे होत आहेत. जे. आर. डी. टाटांना विमान आणि उड्डाणाची आवड कशी निर्माण झाली ? त्याची गोष्टी पुढील प्रमाणे...

’लुईस ब्लेरिअट’ या बहाद्दर वैमानिकाने १९०९ साली इंग्लिश खाडी विमानाने पहिल्यांदा पार केली. आजच्या काळात हे सहज शक्य असलं तरी त्या काळात या गोष्टीची बरीच चर्चा झाली होती. ’लुईस ब्लेरिअट’च्या या कामामुळे जे. आर. डी. अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी १० फेब्रुवारी १९२९ साली पायलटचा परवाना बनवून घेतला. त्यांच्यात विमान शिकण्याची प्रचंड आवड निर्माण झाली होती.

स्रोत

एअर इंडियाची स्थापना

टाटांच्या ध्यासातून त्यांनी १९३२ साली पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली. या कंपनीचं नाव होतं ’टाटा एअरलाईन्स’. दुसऱ्या महायुद्धानंतर ’टाटा एअरलाईन्स’चं नाव बदलून ‘एअर इंडिया’ ठेवण्यात आलं आणि ही कंपनी पब्लिक कंपनी म्हणून घोषित झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एअर इंडियाचे ४९ टक्के शेअर्स सरकारने विकत घेतले. पुढे २५ ऑगस्ट १९५३ साली सरकारने आपल्या गुंतवणुकीत आणखी भर घातल्यानंतर ‘एअर इंडिया’ सरकारी कंपनी बनली.

अशारितीने जे. आर. डी. टाटा यांच्या ध्यासातून एअर इंडिया जन्माला आली. त्याचं बीज ज्या दिवशी पेरलं गेलं तो हा आजचा दिवस...

सबस्क्राईब करा

* indicates required