या गाईचा आकार साधारण गाईपेक्षा डब्बल का आहे भाऊ ? जाणून घ्या विज्ञान काय म्हणतंय !!

सोशल मिडीयावर एका गाईची सध्या चर्चा आहे. ही गाय साधारण गाईपेक्षा डब्बल मोठी आहे भाऊ. तब्बल ६ फुट १४ इंच उंचीची ही गाय अविश्वसनीय वाटते नाही का ? तिच्या भल्यामोठ्या आकारामागे काय कारण असावं ? हा फोटोशॉप तर नाही ना ? चला तर सोशल मिडीयावरच्या व्हायरल गाईची सत्यता पडताळून पाहूया.

मंडळी, होल्स्टीन फ्रिसियन नावाचा गुरांचा एक प्रकार असतो. या जातीतील गाय सर्वाधिक दुध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याखेरीज मांस मिळवण्यासाठी या गुरांना वाढवलं जातं. यासाठी त्यांना आधी नपुंसक केलं जातं. नपुंसक (neutered) केलेल्या होल्स्टीन गुरांचा आकार इतर गुरांपेक्षा मोठा असतो. आपण पाहत असलेली गाय याच प्रकारातील आहे.

(स्रोत)

मंडळी, हल्ली जनुकीय बदलातून प्राण्यांच्या आकार-क्षमतेत बदल करता येतो. पण या गाईच्या बाबतीत तसं झालेलं नाही. ती नैसर्गिकरीत्याच इतरापेक्षा वेगळी आहे. होल्स्टीन फ्रिसियन प्रकार हा २ वेगवेगळ्या प्रजातींचा संकर आहे. हा संकर काही हजार वर्षापूर्वी झाला होता. निसर्गाने दिलेल्या आकारासोबतच या गाईच्या आकारामागे आणखी एक कारण आहे. होल्स्टीन फ्रिसियन जातीतील गुरं आणि वॅग्यू जातीतील गुरांचा हा संकर आहे. वॅग्यू हा जपानी गुरांचा प्रकार आहे जो मुळातच आकाराने मोठा असतो.

मंडळी, या गाईचा आकार ६ फुट १४ इंच एवढा प्रचंड असला तरी ती जगातील सर्वात उंच गाय नव्हे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार अमेरिकेतील ब्लॉसम नावाची गाय जगातील सर्वात उंच गाय होती. तिची उंची ६ फुट २.८ होती. २०१५ साली तिचा मृत्यू झाला.

ब्लॉसम (स्रोत)

मंडळी, आधीच सांगितल्याप्रमाणे या गाईची रवानगी कत्तलखान्यात केली जाऊ शकते. खासकरून मांसासाठी वाढवलेल्या गाई-गुरांना साधारण १५ महिन्यानंतर कत्तलखान्यात पाठवलं जातं. जर समजा या गाईला कत्तलखान्यात पाठवलं नाही तर कदाचित ती आणखी वाढून जगातील सर्वात उंच गाय ठरू शकते. यानिमित्ताने प्राण्यांची मांसासाठी केली जाणारी कत्तल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

(स्रोत)

तर मंडळी, सोशल मिडीयावर फिरणाऱ्या गाई मागची ही होती कहाणी. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required