computer

दोन ऑलिंपिक मेडल्स जिंकूनपण तिला आज पाणीपुरी का विकावी लागत आहे ?

भारतात जर कुणी ऑलिंपिकमध्ये मेडल जिंकून आले तर रात्रीत ते हिरो बनतात. मीडिया पासून तर लोकांपर्यंत सगळ्यांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित होते. त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू होतो. काहींना तर जाहीरातींसाठी कामाचे सुद्धा ऑफर यायला लागतात. पण एक अशी ऑलिंपिक मेडलिस्ट आहे जी एक नाही दोन दोन मेडल जिंकून पण आज पाणीपुरी विकत आहे.

मध्ये प्रदेशातील गीता साहूची ही गोष्ट आहे मंडळी!! 2011 साली झालेल्या अथेन्स ऑलिंपिकमध्ये त्यांनी 200 मीटर आणि 1600 मीटर रनिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. पण इथून पुढे सोनेरी दिवस पाहण्याऐवजी त्यांना हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यांचा सन्मान करणे तर दूरच पण त्यांची साधी विचारपूस देखील कुणी केली नाही. 

त्यांचे भाऊ सांगतात की मानसन्मान आम्हाला नको होता. फक्त पुढे खेळता यावे यासाठी जरी माझ्या बहिणीला मदत झाली असती तरी तिने कर्तृत्व गाजवले असते. गीता साहू यांची परिस्थिती आधीपासून हलाखीची होती, त्यांचे वडील पाणीपुरी विकायचे. जेव्हा त्यांचे वडील आजारी पडले, घराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. अशावेळी त्यांनी रनिंग थांबवून पाणीपुरी विकायला सुरुवात केली. लहानपणापासून शिक्षणासाठी पैसे नसल्याने गीता साहूला शिक्षण घेता आले नव्हते. म्हणून कुठे नोकरी मिळण्याचा पण प्रश्न नव्हता. अशा परिस्थितीत पाणीपुरी विकणे हा एकमेव उपाय त्यांच्या पुढे होता. 

मंडळी, जेव्हा त्यांनी ऑलिंपिकमध्ये मेडल जिंकले तेव्हा त्यांचे वय फक्त 15 वर्ष होते. भारताचा रायजिंग स्टार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. आणि मोजून दोन वर्षांनी त्यांच्यावर पाणीपुरी विकण्याची वेळ आली. आज त्यांची वय 23 आहे आता कुठे स्थिरस्थावर येऊन त्या पुन्हा प्रॅक्टिस करू लागल्या आहेत. पण उमेदीची वर्ष वाया गेल्यावर आता यश मिळेल का हाही प्रश्न आहेच. 

भारतात असे कित्येक उगवते तारे उगवण्यापूर्वीच मावळतात, कारण त्यांना वेळेवर पुरेशी साधन सामग्री मिळत नाही. एकीकडे ऑलिंपिकमध्ये आपल्याला मेडल मिळत नाहीत म्हणून आपण हळहळ करतो आणि दुसरीकडे मेडल जिंकलेल्या लोकांची अशी अवस्था असते अशा परिस्थितीत नवे खेळाडू तयार होण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

 

लेखक : वैभव पाटील 

सबस्क्राईब करा

* indicates required