त्रिपुरा, मेघालय, मणिपूर स्थापना दिन: प्रत्येक राज्यातल्या प्रमुख पर्यटनस्थळांची यादी पाहून घ्या!!
आज त्रिपुरा, मेघालय, मणिपूरचा स्थापना दिन आहे. पाहुयात या राज्यात कोणती पर्यटन स्थळे आहेत. ज्याला तुम्ही आवश्य भेट देऊ शकता. सुरुवात करूया मणिपूरपासून.
मणिपूर राज्य हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले, मणिपूर हे घनदाट जंगले, उंच डोंगर आणि तलाव यासाठी ओळखले जाते. मणिपूरमध्ये पाहता येतील अशी ५ ठिकाणे पुढीलप्रमाणे.
१. इंफाळ -
इंफाळ ही राजधानी असून, मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. इंफाळ शहर हिरवेगार डोंगर, प्राचीन किल्ले यांनी वेढलेले आहे. आरामदायी सुट्टीसाठी हे ठिकाण आदर्श मानले जाते. इथे अनेक तलाव आहेत जिथे आपल्याला फिरायला आवडेल. तसेच तेथेही बरीच ठिकानर आहेत जिथे आपण निसर्ग सौन्दर्याचा आनंद घेऊ शकता.
२. चंदेल
मणिपूरमधील चंदेल जिल्हा देखील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. चंदेल जिल्हा भारत आणि म्यानमारच्या सीमेदरम्यान वसलेला आहे. चंदेल जिल्हा 'लामका' आणि 'गेटवे टू म्यानमार' म्हणून देखील ओळखला जातो. चंदेल जिल्हा मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुमारे 64 कि.मी. अंतरावर आहे. चंदेल जिल्हा आपल्या सौंदर्यासह तसेच संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांसाठी चंदेलचे नृत्य आणि संगीत हे मोठे आकर्षण आहे.
३. तामंगलॉंग -
मणिपूर मधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे तामंगलॉंग शहर जे संत्र्याच्या लागवडीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तामेंगलोंग येथे आलेल्या पर्यटकांना अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींबद्दल माहिती मिळते. तिथले धबधबे खूप प्रसिद्ध आहेत.
४. सेनापती जिल्हा
सेनापती जिल्हा हे मणिपूर राज्यातील मुख्य ठिकाणांपैकी एक आहे. हे क्षेत्र बहुतांश जंगलांनी वेढलेले आहे. सेनापती हा ग्रामीण भाग आहे जो पर्यटकांना खूप आवडतो. तिथले ग्रामीण खाद्यपदार्थ खूप चवदार आहेत आणि लोकही खूप अगत्यशील आहेत.
५. चुराचंदपूर
मणिपूरमध्ये चुराचंदपूर हे देखील एक विशेष ठिकाण आहे. चुराचंदपूर हे आदिवासींचे शहर म्हणून ओळखले जाते, परंतु आता या शहराचा विकास झपाट्याने झाला आहे. चुराचंदपूर येथेही अनेक आकर्षक पर्यटन स्थळे आहेत, त्यापैकी टिपीमुख, टोंगलेन गुहा, तुईबोंग आदिवासी संग्रहालय, नागलोई फॉल्स आणि टिपीमुख अतिशय प्रसिद्ध आहेत.
मेघालय
मेघालय ते शिलाँग हे अंतर सुमारे १११ किलोमीटर आहे. मेघालयातील पर्यटनस्थळ सुंदर पर्वतरांगा, मुसळधार पाऊस, सूर्यप्रकाश, उंच पठार, आकर्षक धबधबे, नद्या व गवताळ प्रदेश यासाठी खूप प्रसिद्ध आहे. संस्कृत भाषेतील मेघालय म्हणजे "मेग किंवा ढगांचे घर".
१ चेरापुंजी -
मेघालयातील चेरापुंजी हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. चेरापुंजीत सर्वात जास्त पाऊस पडतो. पूर्वी ही खासी संस्थानाची राजधानी होती. १८६४ मध्ये राजधानी शिलाँगला नेण्यात आली. येथील वार्षिक सरासरी पर्जन्य सु. १,०८० सेंमी. एवढे आहे. इथे तांदूळ, शिसवी लाकूड, कापूस यांची बाजारपेठ आहे. नोह कालिकाई फॉल्स, थेलेन फॉल्स, नोह स्निग्थियांग फॉल्स ही ठिकाणे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत.
२. मौसिनराम
मौसिनराम हे जगातील सर्वात नेत्रदीपक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे स्थान पर्जन्यप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी नंदनवनासारखे आहे. मसीनराम आणि चेरापुंजी एकमेकांच्या जवळ आहेत. मौसिनराम अर्थ "माव" खासी या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ दगड आहे. या गावाचे आकार शिवलिंगासारखा आहे.
३. तुरा शहर -
मेघालयात फिरण्यासाठी तुरा हे पश्चिम गॅरो हिल्समध्ये एक मोठे शहर आहे. तुकारा पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण म्हणजे नोक्रेक नॅशनल पार्क. हे उद्यान तुरा शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. मेघालयात येणारे अनेक पर्यटक या ठिकाणी जातात.
४. शिलाँग -
शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी आहे. हे देशातील पहिलेच हिल स्टेशन आहे. शिलॉंगचे नाव एक शक्तिशाली देवता यू-शिलाँग यांच्या नावावर आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १४९१ मीटर उंच आहे आणि गुवाहाटी ते शिलाँग हे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. शिलाँग हिल स्टेशन बादलो यांचे निवासस्थान म्हणूनही ओळखले जाते. आपल्या रमणीय टेकड्यांमुळे हे "पूर्वेचे स्कॉटलंड" म्हणून देखील कोठे ओळखले जाते.
५.जोवाई शहर
जोवाई हे पर्यटनस्थळ मेघालयातील जैंतिया हिल्समध्ये आहेत. इथले तलाव आणि पार्क खूप प्रसिद्ध आहेत. जोवाई नावाचे हे स्थळ निसर्गाचा अफाट वारसा आणि संस्कृती यांचे सुंदर मिलाप आहे. थडलस्केन तलाव आणि लालंग पार्क ही पर्यटनस्थळांची प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
त्रिपुरा
त्रिपुराचे भौगोलिक क्षेत्रफळ १०४९६ चौरस किमी असून अगरतळा हे राजधानीचं शहर आहे. त्रिपुराच्या प्रमुख भाषा बंगाली व कोकबराक या आहेत. उत्तरपूर्व राज्य म्हणून या राज्याची ओळख आहे. जानेवारी १९७२ ला या राज्याची स्थापना झाली. त्रिपुराचा संस्कृत अर्थ तीन शहरे असा होतो. त्रिपुरा हे भारतातले लहान राज्य आहे. यात अनेक हिंदू आदिवासी राहतात. इथले उत्सव पाहण्यासारखे असतात. खारची नावाचा त्रिपुरातला लोकप्रिय उत्सव जवळजवळ संपूर्ण आठवडाभर साजरा केला जातो
१. उज्जयंत महाल –
अगरतळा शहरातील हा एक शाही महाल आहे. १९०१ मध्ये याची निर्मिती झाली. रवींद्रनाथ टागोर यांनी याचे नामकरण केले होते. हे खूप मोठे संग्रहालय आहे. इथे चोहोबाजूला आकर्षक बाग आहे. तसेच एक सुंदर तलावही आहे. आतमध्ये खूप सुंदर मूर्ती आहेत. त्यातील प्रमुख मूर्ती या देवतांच्या आहेत. लक्ष्मी नारायण, उमा-महेश्वरी, काली जगन्नाथ या मूर्ती आहेत. इथल्या प्रसन्न वातावरणामुळे बराच वेळ पर्यटक इथे रेंगाळतात.
२. नीरमहाल –
‘द लेक पैलेस ऑफ त्रिपुरा’ असे या महालाला म्हणले जंतर. हा भारतात सगळ्यात मोठा पाण्यात वसलेला महाल आहे. इथे वॉटर स्पोर्ट आहेत. तसेच रात्री लाइट एंड साउंड शो असतो. इथे बोटींगही करता येते. महालात बोटिंगने पोहोचता येते. अतिशय सुंदर असे हे ठिकाण न चुकवण्यासारखे आहे. दरवर्षी बोटींच्या स्पर्धाही येथे खेळवल्या जातात.
३. त्रिपुरा सुंदरी माता मंदिर
हे अतिशय सुंदर असे मंदिर ५०० वर्षे जुनं आहे. १५०१ मध्ये हे मंदिर स्थापन करण्यात आले. दरवर्षी अनेक भाविक येथे जनावरांचे बळी चढवायला येतात. असं म्हणतात विष्णुदेवाने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे ५१ भाग केले होते तेव्हा काही भाग इथे पडले होते. त्यामुळे हे प्रमुख शक्तीपीठ मानले जाते. या मंदिराचा आकार कासवासारखा आहे. दररोज शेकडो भाविक येथे दर्शनाला येतात.
४. सिपाहीजला वन्यजीव अभयारण्य –
सिपाहीजला वन्यजीव अभयारण्य १९ कि.मी. क्षेत्रामध्ये पसरलेले आहे आणि तेथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या १५० हून अधिक प्रजाती आहेत. अगरतळापासून हे २ कि. मी. अंतरावर आहे. हे वन्यजीव अभयारण्य आणि शैक्षणिक आणि संशोधन केंद्र म्हणून विकसित केले गेले आहे. इथे माकडाच्या सर्वात जास्त जाती पाहायला मिळतात. या सुंदर पर्यटनस्थळात अनेक तलाव आहेत, त्यापैकी अमृत सागर तलाव सर्वात लोकप्रिय आहे. इथे बोटिंगची सुविधा देखील आहे.
५. राजबारी राष्ट्रीय उद्यान –
राजबारी राष्ट्रीय उद्यान ही भारतातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानेंपैकी एक आहे. हे उद्यान तब्बल ३१.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. जगातील प्रसिद्ध भारतीय रानगवा (बायसन) साठी हे प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी येथे पाहायला मिळतात. तसेच येथे अनेक औषधी वनस्पती, झुडुपे यांच्या प्रजाती देखील आहेत. या अभयारण्यात ४०० प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. या उद्यानात जीप सफारी आहेत. तसेच मोठा तलाव असल्यामुळे बोटिंगचा आनंदही घेता येतो.
तुम्हाला आधी कुठे जायला आवडेल?