भारतीय सेनेच्या प्रमुखांच्या हॅटचा पट्टा ओठांखाली का असतो ? उत्तर लपलंय थेट इंग्रजांच्या काळात !!
लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग भारतीय सेनेचे प्रमुख आहेत. त्यांचा सैनिकी गणवेश बघितला की एक विचित्र गोष्ट दिसते. त्यांच्या हॅटचा पट्टा हनुवटीखाली नसून तो ओठांच्या खाली आहे. इतर सैनिकी गणवेशापेक्षा हा गणवेश थोडा वेगळा वाटतो नाही का ? त्याचं काय कारण असावं ?
राव, या मागे एक जुनं कारण आहे.
तुम्हाला तर माहित असेलच भारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट आहेत. यातलीच एक रेजिमेंट म्हणजे गुरखा रेजिमेंट. या रेजिमेंटची हॅट घालण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. या पद्धतीत हॅटचा पट्टा ओठाखाली ठेवला जातो. जनरल दलबीरसिंग सुहाग हे गोरखा रेजिमेंट मधून आलेले असल्याने त्यांनी गोरखा रेजिमेंटची पद्धत कायम ठेवली आहे.
हॅटचा पट्टा असा का ठेवला जातो याची अनेक करणं सांगितली जातात. त्यापैकी काही प्रमुख करणं समजून घेऊया.
गुरखा रेजिमेंटला ही पद्धत इंग्रजांनी दिली आहे. इंग्रजांच्या सैन्यात ही पद्धत होती. हॅटचा पट्टा गळ्याखाली असेल तर युद्धकाळात पट्टा ओढून गळा घोटणे शत्रूला सहज सोप्पे होते. हे होऊ नये म्हणून ही अनोखी शक्कल लढवली गेली होती. हीच पद्धत गोरखा रेजिमेंटने घेतली.
आजही इंग्लंडच्या प्रसिद्ध लाल कपडे आणि उंच काळ्या हॅट मधल्या सैनिकांचा हॅटचा पट्टा ओठांखालीच असतो. हे तुम्ही टीव्हीवर पाहिलंच असेल.
दुसरी गोष्ट अशी की, गुरखा रेजिमेंट मध्ये पहाडी लोक असतात. त्यांची उंची इतर सैनिकांपेक्षा कमी असते. असं म्हणतात की, आपली उंची इतरांसमोर कमी दिसू नये म्हणून ते आपल्या हॅटचा पट्टा ओठांखाली ठेवतात. ही आयडिया सुद्धा त्यांना इंग्रजांनी दिली.
तिसरं कारण असंही सांगितलं जातं की सैनिकांना आपलं तोंड बंद ठेवण्यासाठी या पट्ट्याचा वापर होतो. आता तोंड बंद ठेवण्यासाठी म्हणजे काय ? तर, सैनिक जोशात येऊन ओरडू नये आणि त्याच्या ओरडण्याने शत्रू सावध होऊ नये म्हणून हा पट्टा ओठांखाली ठेवला जातो.
मंडळी, ज्या कारणांसाठी ही पद्धत घेतली गेली होती ती करणं आज बदलली असली तरी ही पद्धत गणवेशाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. अशा प्रकारे हॅटचा पट्टा कसा असावा यामागे सुद्धा तब्बल १०० जुना इतिहास आहे.
आणखी वाचा :
जाणून घ्या भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सॅल्युट एकमेकांपेक्षा वेगळे का असतात?
भारतीय सैन्यामध्ये महिला अधिकार्यांना कशाप्रकारे संबोधित केलं जातं? जाणून घ्या...
सलाम सिंगने ७००० पानांच्या गुप्त माहितीमध्ये नक्की काय काय चोरलं आणि कुणाला विकलं ?
परमवीरचक्र, अशोकचक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र, शौर्यचक्र कुणी डिझाईन केली आहेत माहित आहे का ?
इयान कारडोझो : भारतीय सैन्याच्या या अधिकाऱ्याने स्वतःचाच पाय कापून टाकला होता !!
सर्जिकल स्ट्राईकमध्ये वापरलेल्या शस्त्रांची घेऊया दसऱ्याच्या निमित्ताने खास माहिती !!