आजचं चॅलेंज : दोन चालीत मात करून दाखवा !!!
सुप्रभात मंडळी, आज शनिवार म्हणजे बऱ्याच जणांचा सुट्टीचा दिवस ! आज आम्ही तुमच्यासाठी एक बौद्धिक व्यायाम घेऊन आलोय. तुमच्यासमोर एक बुद्धिबळाचा डाव मांडला आहे. डावाच्या शेवटच्या २ चालीत पांढऱ्याने काळ्यावर मात करायची आहे. बुद्धिबळाच्या भाषेत याला 'एंड गेम' असं म्हणतात. एंड गेम हा डावात सगळ्यात महत्वाचा असतो. याचे कारण असे की दुसऱ्यावर मात करण्याचे अंतिम उद्धिष्ट एंड गेममुळेच साध्य होते.
तुमची चाल काय असेल. थोडं डोकं लावा आणि जर नाहीच जमलं तर खालील फोटोवर क्लिक करा. तुम्हाला उत्तर मिळेल पण त्याआधी स्वतःहून ट्राय करा राव !