मुंगीबद्दलच्या या १२ गोष्टी माहिती आहेत का..?

एक होती मुंगी
तिने नेसली लुंगी
तिने ऐकली पुंगी
तिला आली गुंगी

निदान आपल्या घरात तरी दोन प्रकारच्या मुंग्या दिसतात. एक काळी आणि दुसरी लाल. लाल मुंगी चावते, पण काळ्या मुंग्यांमध्ये काही मुंग्या चावत नाहीत, तर काही अत्यंत वाईट चावतात. अगदी लहान मुंगी देखील असते, काळ्या रंगाची! तिला आपण लहानपणी साखर टाकायचो. ती कधी येते आणि साखर नेते हे आपण बघत बसायचो.

अनेकदा ती मुंगी आपल्या तोंडात पांढरं काही तरी घेऊन जाताना दिसते. मग आपल्याला कोणी वडिलधाऱ्याने सांगितलं असेल की ती तिची अंडी आहेत.

घरात गोड असेल तर मुंगी येतेच. इवलीशी मुंगी, पण या मुंगीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात मंडळी. आज आम्ही या मुंगीच्या अशाच काही न ऐकलेल्या १० गोष्टी सांगणार आहोत.

चला तर पाहूयात..

 

१. मुंगी हा असा प्राणी आहे जो जगभरात सर्वत्र आढळतो. अंटार्क्टिका आणि काही मोजक्या बर्फाळ प्रदेशाला सोडून पृथ्वीवर सर्वत्र मिळणारा जीव म्हणजे मुंगी.

Image result for awesome photo of antsस्रोत

 

२. जगभरात मुंग्यांच्या तब्बल १२००० जाती आहेत. ०.०३ इंच पासून ते २ इंच पर्यंतच्या या मुंग्या विविध आकारांत दिसून येतात.

Image result for awesome photo of antsस्रोत

 

३. सर्व मुंग्यांना जन्म देणारी राणी मुंगी ही ३० वर्षापर्यंत जगते. हे आयुष्य़ इतर मुंग्यांपेक्षा १०० पटीने जास्त आहे.

Image result for queen ant

स्रोत

 

४. मुंग्यांच्या सर्वात मोठ्या वसाहतीला ‘सुपरकॉलनीज’ म्हणतात. हे मोठे वारूळ तब्बल ३७०० मैल लांब असू शकते. यात जवळ जवळ १ अब्जपर्यंत मुंग्या राहू शकतात.

Image result for ants hillsस्रोत

 

५. असं म्हटलं जातं की मुंग्या त्यांच्या शरीराच्या सुमारे ५० पट जास्त वजन उचलण्यास सक्षम असतात, परंतु ‘ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या एका वैज्ञानिक संशोधनात असे म्हटले आहे की हे वजन फक्त ५० पट नसून सुमारे ५००० पट एवढे जास्त असू शकते.

Related imageस्रोत

 

६. मुंग्या फक्त ओझे उचलण्यात सक्षम नसतात, तर त्या चांगल्या धावपटू्सुद्धा असतात. त्या प्रत्येक सेकंदाला ३ इंच एवढं धावू शकतात. माणसाने जर ही स्पीड पकडली तर तो ताशी ५५ किलोमीटर एवढ्या वेगाने धावू शकेल.

स्रोत

 

७. मुंग्यांच्या इवल्याश्या शरीरात २ लाख ५० हजार मेंदू पेशी असतात. त्यामुळे मुंगी ही सर्वात ‘स्मार्ट’ कीटक आहे.

Image result for ants brain cellsस्रोत

 

८. बुलेट ऍंटच्या चाव्यास सर्वात वेदनादायी मानले जाते, तर ‘जॅक जम्पर’ या जातीतील मुंगीचं चावणं हे अत्यंत घातक ठरू शकतं.

Image result for Jack Jumper Antस्रोत

 

९. मुंग्या सरळ रेषेत चालतात. त्यामुळे त्यांना शिस्त असते, असं वगैरे आपल्याला सांगितलं जातं. पण यामागचं विज्ञान असं आहे की प्रत्येक मुंगी आपल्या मागे एक द्रव स्त्रावते. त्यामुळं मागून येणाऱ्या मुंगीला पुढची दिशा समजते.

Image result for ants lineस्रोत

 

१०. जगभरात मुंग्या या लाल आणि काळ्या रंगात असतात. पण काही ठिकाणी हिरव्या रंगाच्या सुद्धा असतात बरं का!

Related imageस्रोत

 

११. मुंगीच्या शरीराची अशी काही बनावट असते की तिला विमानातून फेकलं तरी काही होणार नाही. उंचावरून पडून पुन्हा चढणं हा त्यांचा मोठा गुणधर्म असतो.

स्रोत

 

१२. शेवटचं म्हणजे माणूस आणि मुंग्या हे असे एकमेव प्राणी आहेत जे आपल्या अन्नाचा साठा करून ठेवतात! 

आहे की नाही रंजक ??

 

आणखी वाचा..

मुंगीचं वारूळ जमीनीत खरंतर असं असतं बरं..

सबस्क्राईब करा

* indicates required