computer

ही आठ फुलं कशाची आहेत तुम्ही ओळखूच शकणार नाही.. दुसरं आणि तिसरं फूल ओळखणं तर खूपच अवघड आहे बरं..

निसर्गात इतकी विविधता आहे की ते पाहण्यात आणि अभ्यासण्यात आपलं आख्खं आयुष्य गेलं तरी तो अभ्यास काही संपायचा नाही.. अहं.. घाबरू नका, आम्ही काही तुम्हांला अभ्यास करायला सांगत नाही आहोत. तर आज आम्ही घेऊन आलो आहोत काही फुलं.. खरंतर ही फुलं पाहण्याचा कधी चान्स मिळत नाही, पण ही ज्या झाडांची फुलं आहेत, त्या झाडांपासून निघालेल्या वस्तू वापरल्याविना आपला एक दिवसही जात नाही..

कोडं वाटतंय ना? चला तर मग सोडवूयात की कोडी..

१. लवंग

हे कोडं तसं खूप सोपं आहे. लवंग म्हणजे खरंतर मूळच्या इंडोनेशियातल्या मर्टेसियाई(Myrtaceae ) या झाडाच्या सुकलेल्या कळ्या. त्यांचं लालचुटूक फूल काय गोड् दिसतंय नाही?

२. हिंग

आता बघा, हिंग कसा बनतो हेच कित्येकांना माहित नसतं, मग हिंगाचं फूल कसं माहित असणार? हे पिवळंधम्मक फूल आहे हिंगाच्या झाडाचं!! विश्वास नाही ना बसत? 
तर हिंगाचं झाड चांगलंच मोठं असतं. त्याच्या खोडावर एकप्रकारचा रस जमा होतो. हा रस वाळवला जातो.  तो असतो आपला खडा हिंग. हा खडा फोडणंही भारी अवघड काम असतं म्हणतात. तो सहसा फॅक्टरीत स्टोअनक्रशरनं फोडला जातो..

३. कांदा

हा आहे आपला लाडका कांदा. चिरताना रडवणारा, पण त्यावाचून आपलं काम अडतं.. जरा महाग झाला की लगेच बातमीही होते. तर हे पांढरंशुभ्र फूल आहे कांद्याचं. याचे बी कलौंजी म्हणून मसाल्यात वापरतात. आपल्या महाराष्ट्रात कलौंजी तितकी वापरली जात नाही, पण उत्तर भारतात तिच्यावाचून काम होत नाही म्हणे..

४. जिरे

जिऱ्या मोहरीच्या फोडणीशिवाय किती भाज्या करता येतात हो? करण जौहरच्या सिनेमांत मोहरीची पिवळीधम्मक फुलं आणि शेतं पाहिली असतीलच.. पण जिऱ्याचं फूल सहसा पाहायला मिळत नाही..

५. दालचिनी

दालचिनी म्हणजे झाडाची साल हे जरी खरं असलं, तरी त्या झाडालाही फुलं असतात.. 

६. खसखस-अफू

आपण खसखस आहारात सर्रास वापरतो.. खसखस लावलेल्या अनारशांशिवाय दिवाळी म्हणून काही साजरी होत नाही. पण तुम्हांला माहितेय का, खसखस हे खरंतर अफूचं बी असतं हे? म्हणून कित्येक देशांत खसखशीवर चक्क बंदी आहे. या लाल फुलांचा रस आजारात वेदना कमी व्हाव्यात म्हणून पूर्वी भूलीचं औषध म्हणूनही वापरायचे म्हणे.. या झाडाला बोंडं येतात, ती पिकली ती फुटतात किंवा त्यांच्यावर चिराही दिल्या जातात. मग त्यांना झोडपून खसखस म्हणजेच अफूचं बी बाहेर काढलं जातं..
 

७. बडीशेप

हे असले तुरे शाळेच्या बाहेर विकायला आलेले तुम्ही पाहिलेच असतील.. ओले बडीशेपेचे तुरे खायलाही छान लागतात..

८. वेलदोडा

हे दुरंगी फूल आणि फिकट गुलाबी कळ्या आहेत आपल्या लाडक्या वेलदोड्याच्या.. यांचं फळ किंवा त्याच्या बिया म्हणजे वेलदोडा..

 

आता खरंखरं सांगा बरं, यातली किती फुलं तुम्हांला माहित होती ते..

सबस्क्राईब करा

* indicates required