विमानाच्या खिडक्यांना असलेल्या या छिद्रामागाचे लॉजिक पटकन वाचून घ्या बरे !!
तुम्ही कधी विमानातून प्रवास करताना खिडकीच्या काचेखाली असलेल्या त्या लहानशा छिद्राकडे लक्ष दिलं आहे का हो? ते बारीक होल कशासाठी असते राव? खरंतर विमानातून प्रवास करताना बाहेरचं इतकं सुंदर दृश्य दिसत असतं की आपलं त्याकडे लक्ष जाणं कठीण आहे.
मंडळी, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या लहानशा छिद्रामागचं लॉजिक !!
विमानातल्या खिडक्यांना प्रत्येकी तीन काच लावलेल्या असतात. हवेचा दबाव बाहेरच्या काचेवर सर्वात जास्त दबाव असतो. यामुळे विमानाच्या आतला दबाव नियंत्रित करण्यासाठी हे छिद्र मधल्या काचेला पाडण्यात आलेलं असतं. या छिद्रला "ब्रिथ होल" म्हणतात.
३५००० फुट उंचीवर १.५ किलोग्रामचा दबाव आला तर मानवी शरीराला धोका असतो. त्यामुळे ३.५ किलोग्रामचा दबाव कृत्रिमरीत्या तयार केला जातो. मंडळी महत्वाचं म्हणजे हे छिद्र नसेल तर खिडकीचे तुकडे तुकडे होऊ शकतात.
मग आहे की नाही “छोटी चीज बडे काम की !!”