गिनीज बुक आणि लिमका बुक...जाणून घ्या विश्वविक्रमांच्या या दोन पुस्तकांमधला फरक !!

मंडळी एका अमेरिकन कुत्र्याने त्याच्या सर्वात लांब जीभेसाठी आधीचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. आपण अनेकदा अशा बातम्या वाचतो की अमुक एकाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले, तमुक एकाने लिमका वर्ल्ड रेकॉर्ड केले... या वर्ल्ड रेकॉर्डबद्दल तर आपल्याला माहित आहे, पण विश्वविक्रम करणे म्हणजे नेमकं काय? लिमका आणि गिनीज विश्वविक्रमात फरक काय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रेकॉर्ड केल्यानंतर हे लोक आपल्याला पैसे देतात का? या सर्व गोष्टी सामान्य माणसाला माहित नसतात.

या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही घेऊन आलो आहोत :

विश्वविक्रम करणे म्हणजे काय ?

विशिष्ट कैशल्य दाखवून सर्वोत्तम जागतिक कामगिरी करणे म्हणजे विश्वविक्रम. विश्वविक्रम करताना ते नीट तपासून आणि पारखून नोंद केली जाते. एका अर्थी आपण आपलं नाव इतिहासात कोरत असतो.

 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स

स्रोत

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे विश्वविक्रम केलेल्या व्यक्तींची नोंद ठेवणारं पुस्तक असून जगभरातील कोणत्याही व्यक्तींचा यात समावेश होऊ शकतो. १९५५ पासून दरवर्षी प्रकाशित होणारे हे एक संदर्भ पुस्तक आहे.

 

लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स

स्रोत

गिनीजपेक्षा लिमका बुक वेगळे आहे. लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स हे फक्त भारतीय माणसांपुरतं मर्यादित असून गिनीज बुकप्रमाणेच दरवर्षी प्रकाशित केलं जातं.

 

रेकॉर्ड बनवल्यानंतर पैसे मिळतात का ?

याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. गिनीज आणि लिमका बुकसाठी अर्ज करताना तुम्हाला पैसे भरावे लागत नाहीत आणि विक्रम केल्यावर पैसे मिळतही नाहीत. तुमच्या कामात जर तुम्हाला काही खर्च आला तर तो सुद्धा तुम्हालाच भरावा लागतो. असं असलं तरी तुमचं नाव मात्र कायमचं इतिहासात नोंदवलं जातं हे नक्की.

 

तर मंडळी, काही तरी भन्नाट करून तुम्हाला जर इतिहासात अजरामर व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच दोन्ही पैकी कोणत्याही विश्वविक्रमासाठी अर्ज करू शकता.

सबस्क्राईब करा

* indicates required