आर्मी आली मुंबईकरांच्या मदतीला !!

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने खुद्द भारतीय लष्कराला पूल बांधणीसाठी पाचारण केलं आहे. आता प्रश्न पडतो की लष्कर आणि पूल बांधणार ? मंडळी, लष्कराला अश्याही कामाची स्पेशल ट्रेनिंग मिळाली असते.

चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.

तर, लष्करात ‘आर्मी इंजिनियर्स’ ची एक टीम असते. हे आर्मी इंजिनियर्स रस्ते बांधणी, पाणीपुरवठा, वीज, ड्रेनेज, इत्यादी सेवा लष्कराला पुरवतात. २०१४ साली आर्मी इंजिनियर्स च्या टीमने जम्मू काश्मीर मध्ये फक्त २४ तासात पूल बांधून तयार केला होता. ‘पुंछ’ भागाला जम्मूशी जोडणारा हा एकमेव पूल पुरात वाहून गेल्यामुळे पुंछशी संपर्क तुटला होता. अश्यात भारतीय लष्कराने अवघ्या एका दिवसात पूल बांधून तयार केला.
स्रोत

तर, आता याच जवानांना  मुंबईत ३ पुलंच्या बांधणीचं काम दिलं गेलं आहे. यात एल्फिन्स्टनचा देखील समावेश असेल. हा पूल फेब्रुवारी २०१८ पर्यंत बांधून तयार होईल असा अंदाज आहे. 

...पण एका निवृत्त आर्मी इंजिनियरने सांगितल्या प्रमाणे “हे काम लष्कराचं नाही. कारण लष्कराला तात्पुरत्या स्वरूपातील पूल बांधता येतात. अश्या पुलांचा उपयोग संपला की त्यांना तोडून टाकण्यात येते.” म्हणजेच आपत्कालीन स्थितीसाठी लष्कराला अशी स्पेशल ट्रेनिंग मिळालेली असते.

आता प्रश्न असा आहे की हा नवीन पूल कसा तयार होईल आणि तो किती काळ टिकेल !!

सबस्क्राईब करा

* indicates required