पडद्यावरच्या पोलिसांना खऱ्या पोलिसांपेक्षा जास्त पगार....किती आहे CID च्या कलाकारांच मानधन ?
‘CID’ मालिकेला जानेवारी २०१८ रोजी २० वर्ष पूर्ण होतील. इतका प्रदीर्घ काळ कोणताही अडथळा न येता सुरु असलेली दुसरी कोणतीच मालिका भारतात नाही. CID चे निर्माते ‘बी. पी सिंह’ हे एकदा मुलाखतीत म्हणाले होते की ‘CID १०० पेक्षाही कमी एपिसोड्ससाठी सुरु झाली होती. कोणालाच माहिती नव्हतं की हा प्रोग्रॅम किती चालेल. पहिल्या एपिसोडचं चित्रीकरण करताना ‘शिवाजी साटम’ यांना सोडून बाकी सगळ्यांना मानधन दिलं होतं कारण बजेट कमी होता. आणि अश्या प्रकारे हा प्रवास सुरु झाला.’
सुरुवातीला बजेट कमी होतं पण पुढे CID चा पसारा वाढला, लोकांनी मालिकेला डोक्यावर घेतलं आणि मालिकेने TRP चे उच्चांक गाठले. आता इतक्या प्रसिद्ध टीव्ही शो मधल्या कलाकारांना मानधन किती मिळत असावं हा एक प्रश्न पडतोच. यावर आम्ही माहिती गोळ्या केल्यानंतर CID मालिकेत काम करणाऱ्यांच्या मानधनाचे आकडे समोर आले. ही माहिती सांगते की CID च्या कलाकारांना खऱ्या CID अधिकाऱ्यांपेक्षाही पेक्षा जास्त पगार मिळतो राव.
तर, चला आज जाणून घेऊया CID च्या काही प्रसिद्ध पात्रांना नेमकं किती मानधन मिळतं !!