औषधाच्या गोळीच्या पाकीटावर अशा रिकाम्या जागा कशासाठी असतात? माहीतीये का तुम्हाला?
औषधाच्या कडवट गोळ्या खाणं तसं सगळ्यांच्याच जीवावर येतं मंडळी. पण आजारी पडल्यावर मात्र प्रत्येकाला नाईलाजाने का असेना, त्या खाव्याच लागतात. जर तुम्ही निरिक्षण केलं असेल, तर तुम्हाला काही औषधांच्या पाकीटावर गोळीच्याच आकाराच्या जागा दिसल्या असतील. ज्यामध्ये टॅब्लेट वैगेरे काहीही नसून ती रिकामीच ठेवलेली असते. पण कशासाठी असतात या बिनकामी जागा? खरंतर त्या बिनकामी नसून त्या जागा ठेवण्यामागे काही कारणंही आहेत. या पाहूया...
पहिलं कारण आहे आपल्या सुरक्षेसाठी. या रिकाम्या जागा त्या गोळीच्या सभोवती ठेवलेल्या असतात, ते यासाठी की दोन गोळ्या एकमेकांमध्ये मिसळून कोणतीही केमिकल रिअॅक्शन होऊ नये.
अशा जागा असण्यामागे दुसरं कारण म्हणजे प्रिंटिंगसाठी जागा वाढवणं. औषधाच्या निर्मीतीची तारीख, त्याची कालबाह्य होण्याची तारिख, त्यामधील घटक, अशा अनेक गोष्टी छापण्यासाठी त्या स्ट्रीपवर पुरेशी जागा हवी असते. ती या रिकाम्या आकारामुळे वाढवली जाते.
आणखी एक कारण म्हणजे कधी कधी एक गोळी तुम्हाला आठवड्यातून एकदा, कींवा ठराविक दिवसांच्या अंतराने एकदा घ्यायला सांगितली जाते. अशावेळी डोस लक्षात राहण्यासाठी एकेका गोळीचे स्वतंत्र पाकीट कापले जाते. या एका गोळीच्या प्रत्येक पाकीटावर स्वतंत्रपणे माहिती छापता यावी आणि या स्ट्रिप व्यवस्थित कापता याव्यात, म्हणूनही या जागा या स्ट्रीप्सवर दिलेल्या असतात.
आणि शेवटचं कारण म्हणजे या रिकाम्या जागा त्या टॅब्लेट साठी धक्का शोषणाचं काम करतात. म्हणजेच पॅकींग कींवा वाहतुकीदरम्यान या गोळ्यांना धक्का लागून त्या फुटणं, पसरणं असे प्रकार या जागांमुळे रोखले जातात.
पाहीलंत ना मंडळी? फक्त सजावट आणि नीटनेटकेपणा दिसण्यासाठी या जागा दिलेल्या नसून त्यामागे ही सारी कारणं आहेत. माहिती आवडली तर शेअर करून आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा...