मेंदू ताजातवाना ठेवण्याच्या ७ अफलातून ट्रिक्स !!
कामाच्या वेळात कंटाळा येतो, आळस येतो, उत्साह सुद्धा नसतो पण काम तर करावच लागतं ना भाऊ. अश्यावेळी आपण कॉफी किंवा चहा घेऊन मूड फ्रेश करण्याचा प्रयत्न करतो. हा उपाय तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण आज आम्ही तुम्हाला ७ अश्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्या आजमावल्यानंतर तुमचा मेंदू एका झटक्यात ताजातवाना होईल आणि तुम्ही काम करायला पुन्हा तयार व्हाल.
या ७ ट्रिक्स बघून घ्या आणि आजचं ट्राय करून बघा....
१. लिंबू चावा
ऐकूनच झिणझिण्या आल्या ना ? पण हा एक रामबाण उपाय आहे राव. लिंबू चावल्याने तुम्हाला जाणवणाऱ्या झिणझिण्या तुमच्यात असलेली सुस्ती एका झटक्यात नाहीशी करेल. थोडा कठीण आहे पण ट्राय करून बघायला काय हरकत आहे ?
२. थंड पाण्याचा शिडकाव
जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्हाला झोप येत आहे आणि तुम्ही कधीही डुलक्या घेऊ लागाल तेव्हा तोंडावर थंड पाण्याचा शिडकाव करा. असं केल्याने तुमची झोप जाईल तुम्ही कामासाठी पुन्हा तयार व्हाल.
३. मनगटावर थंड पाणी घेणे
थंड पाण्याने चेहरा धुण्यासारखाच हा उपाय आहे. तुम्हाला जर चेहऱ्यावर थंड पाणी घ्यायला आवडत नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. खास करून त्या मुलींसाठी ज्यांना आपल्या मेकअपची फार काळजी असते.
४. कानांच्या पाळीचा मसाज
हा उपाय करताना तुम्ही दोन्ही कानांच्या पाळीला घट्ट दाबून धारा. कानाच्या पाळी जवळ असलेल्या विशिष्ट भागावर दाब दिल्याने तुमची झोप उडण्यास मदत होईल. ध्यानधारणेच्या वेळी झोप येऊ नये म्हणून वापरण्यात येणारी ही एक जुनी पद्धत आहे.
५. जांभई देणे
ही सगळ्यात सोप्पी पद्धत आहे मंडळी. कंटाळा आलेला असताना आणि जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो तेव्हा तुम्ही जांभई दिल्यास तुम्हाला फ्रेश वाटेल. तस पाहायला गेलं तर कंटाळा आला म्हणजे जांभई ही येणारच पण नैसर्गिकरीत्या जांभई आल्यानंतरसुद्धा ६ ते ७ वेळा स्वतःहून जांभई दिल्याने तुमचा मेंदू पुन्हा काम करायला तयार होईल.
६. काही तरी चघळत राहा
च्विंगगम, मिंट किंवा गोळी चघळत चघळत राहिल्याने तुमचा मेंदू एका जागी गुंतून राहतो आणि तुम्हाला कंटाळा येत नाही. मिंट ची टेस्ट कशी आहे यावरही बरचस अवलंबून आहे. टेस्ट जर झिणझिण्या आणणारी असेल तर त्याचा फायदा जास्त होईल.
७. आळोखे पिळोखे
अंगातला आळस झटकून टाकायला हा ऑप्शन जास्त फायदेशीर ठरू शकतो. आपल्या स्नायूंना सैल करून त्यांची मरगळ झटकून टाकल्याने तुमचा बराचसा थकवा आणि आळस नाहीसा होईल. जर तुम्हाला जमलं तर २० पुशअप्स देखील करू शकता. पण मंडळी, जर तुम्हाला खूपच कंटाळा आला असेल तर वरील ६ उपाय तर आहेतच.
मंडळी या ७ ट्रिक्स तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. रोजच्या कामाला यामुळे नक्कीच ऊर्जा मिळेल.