computer

या ७ पोलीस फोर्सेस जगातल्या सर्वोत्तम फोर्सेस का आहेत ?

प्रत्येक देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असते. जगात अशा ७ पोलीस यंत्रणा आहेत ज्यांना आधुनिक आणि सर्वोत्तम पोलीस दल मानलं जातं. आता तुमच्या मनात भारताच्या पोलीस यंत्रणेबाबत प्रश्न आला असेल. खरं तर या ७ च्या यादीत भारताचा नंबर लागत नाही. पण आपण हे तर नक्कीच बघू शकतो की या ७ पोलीस यंत्रणा सर्वोत्तम का आहेत ?

चला तर आज जाणून घेऊया जगातील ७ पोलीस यंत्रणा !!

७. BOPE, ब्राझील

 

ब्राझीलच्या BOPE ची ओळख अत्यंत उच्च दर्जाचे, प्रशिक्षित कमांडो युनिट कम पोलीस दल म्हणून आहे. अत्यंत दुर्गम अथवा अत्यंत गजबजलेल्या भागात काम गुन्हेगारांशी लढून त्यांचा निःपात करण्याची त्यांची क्षमता अत्यंत कौतुकास्पद आहे.

६. जुंगला, कोलंबिया

कोलंबियाच्या जुंगला पोलीस दलाला लष्करी पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे पोलीस दल कम लष्कर आहे असं आपण म्हणू शकतो. ‘जुंगला’चं मुख्य काम आहे कोलंबियाच्या जंगलातून अमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणं.

५. फ्रेंच पोलीस युनिट (RAID), फ्रांस

फक्त ३२० पोलीस असलेलं फ्रांसचं पोलीस युनिट दहशतवादी कारवायांविरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. हे पोलीस दल वेगवेगळ्या सेक्शन्स नुसार अत्यंत काटेकोरपणे काम करतं. शोध मोहिमेची आखणी, हत्यारे, तांत्रिक बाजू सांभाळणे इत्यादी कामे वाटली गेलेली असतात.

४. Grupo Especial de Operaciones, स्पेन

इंग्रजीत या पोलीस दलाला ‘स्पेशल ऑपरेशन ग्रुप’ म्हणतात. १९७७ साली या पोलीस दलाची स्थापना देशातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी झाली. हे पोलीस दल म्हणजे एक प्रकारे पोलीस आणि लष्कराचा मिलाफ आहे. असं म्हटलं जातं की स्पेन मधल्या पोलीस कारवायांमध्ये सर्वाधिक यश मिळवण्याचं श्रेय या पोलीस दलाचं आहे. उत्तम ट्रेनिंग हेच यामागचं कारण आहे.

३. रॉयल कॅनडियन माउंटेड पोलीस, कॅनडा

संपूर्ण जगभरात नावाजलेल्या पोलीस फोर्स मध्य RCMP, कॅनडा चा समावेश होतो. कॉम्बॅट ट्रेनिंग बरोबरच यांचा भर शैक्षणिक पात्रतेवरही असतो. यामुळे त्यांची कार्यक्षमता खूपच आधुनिक व पुढारलेली असते.

२. नॅशनल पोलीस एजन्सी, जपान

स्थानिक गुन्हेगारी पासून आंतरराष्ट्रीय शोध मोहिमांपर्यंत जपानचं नॅशनल पोलीस दल अत्यंत कुशलतेने काम करण्यासाठी ओळखलं जातं. जगातील सर्वोत्तम प्रशिक्षित पोलिस दलात या पोलीस दलाचा समावेश होतो.

१. यामाम, इस्राईल

सीमेवर असलेल्या पोलीस दलात यामाम पोलिसांचा समावेश होतो. दहशतवादी कारवायात लोकांची सुटका करण्याची जबाबदारी या पोलीस फोर्स वर असते. जगातील सर्वोत्तम पोलीस डेपार्टमेंट मध्ये यामामचा समावेश होतो कारण त्यांची ट्रेनिंग इतर पोलिसांपेक्षा वेगळी आणि अत्यंत खडतर असते.

६ महिने ट्रेनिंग आणि १ आठवडा स्पेशल ट्रेनिंग नंतर पोलीस बहरती केली जाते. या शेवटच्या एक आठवड्याच्या ट्रेनिंगला ‘हेल विक’ म्हटलं जातं. यावरून तुम्हाला अंदाज येईलच की एक एक पोलीस किती ताकदीचा निवडला जातो ते.

 

या सातही पोलीस दलांना सर्वोत्तम बनवण्यात त्यांची आधुनिक प्रशिक्षण पद्धती आणि उत्तम शिस्तबद्धता कारणीभूत ठरते.

 

आणखी वाचा :

देशाच्या पहिल्या तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची कहाणी !!!

पोलिस आयुक्त सांगत आहेत, चेंगराचेंगरी कशी घडते आणि ती कशी टाळता येऊ शकते...

जाणून घ्या या व्हायरल फोटोमागचं सत्य...

सबस्क्राईब करा

* indicates required