...जेव्हा क्रिकेटचा देव 'गली क्रिकेट' खेळतो.... पाहा हा व्हायरल व्हिडीओ !!
सचिन तेंडूलकरला क्रिकेटपासून निवृत्त होऊन ४ वर्ष पूर्ण झाली. पण त्याच्या आत असलेलं क्रिकेट रिटायर व्हायला तयार नाही राव. आता हेच बघा ना!! सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात चक्क सचिन तेंडूलकर ‘गल्ली क्रिकेट’ खेळताना दिसतोय.
मेट्रोचे कामगार मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी क्रिकेट खेळत होते आणि त्याच वेळी एक कार तिथं येऊन थांबली. हे म्हणजे अचानक देव प्रकट व्हावा असंच होतं. कारण कारमधून चक्क ‘क्रिकेटचा देव’ सचिन बाहेर निघाला. लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
तो बाहेर आला आणि त्याने बॅट हातात घेतली. सचिनला पुन्हा एकदा खेळताना बघून लोकांना व्हिडीओ काढण्याचा मोह आवरता आला नाही. विनोद कांबळी याने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आणि त्यानंतर तसेच इतर व्हिडीओ व्हायरल झाले. मंडळी, तुम्ही सुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ. सचिनभाऊ चक्क रस्त्यावर क्रिकेट खेळतोय...
@sachin_rt. Master Blaster good to See you enjoying like Old times pic.twitter.com/9I96AcfKfG
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) April 16, 2018
Here is complete video of @sachin_rt street cricket yesterday in #Bandra pic.twitter.com/gihlljoA1O
— Sachinist.com (@Sachinist) April 16, 2018