६६ कलाकार ४३ गाणी आणि एक व्हिडीओ....मराठी कलाकारांचा 'अकापेला' व्हिडीओ बघितला का ?
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/marathi.jpg?itok=DoCwo4_O)
६६ कलाकार ४३ गाणी आणि एक व्हिडीओ. मराठीतील जवळजवळ सगळेच कलाकार एका व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत असतील तर काय बहार येईल राव. हे शक्य झालं आहे भारतीय सिनेमाच्या १०५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने.
मराठीतील गाजलेली गाणी, संवाद आणि अफलातून कलाकारांना घेऊन ए. व्ही. के एन्टरटेनमेंट ने एक नवीन व्हिडीओ सादर केला आहे. या पद्धतीने एका प्रकारे मराठी सिनेसृष्टीच्या सर्व आधारस्तंभांना सलाम केला गेला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओतील गाणी आणि एकूण संकल्पना ‘अकापेला’ पद्धतीची आहे.
आधी अकापेला काय आहे ते समजून घेऊया.
अकापेला हा संगीताचा एक प्रकार आहे आणि त्यात वाद्याचा उपयोग केला जात नाही. वाद्यांची जागा कलाकारांनी काढलेल्या आवाजांनी भरली जाते. या व्हिडीओ मध्ये याच प्रकारे संगीत दिलेलं तुम्ही पाहू शकता.
विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, अशोक सराफ (मामा), महेश कोठारे, महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव, प्राजक्ता माळी, दस्तुरखुद्द तात्या विंचू, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, स्वप्नील बांदोडकर....राव आणखी भरपूर मोठी लिस्ट आहे. या सगळ्या कलाकारांनी आपली कला एकाच जागी सदर केलेली पहायची असल्यास हा व्हिडीओ लगेचच बघून घ्या. यातलं कोणतं गाणं किंवा संवाद तुम्हाला आवडला ते आम्हाला नक्की सांगा बरं का !!