अजय अतुलच्या संगीताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा वेड लागणार....'माऊली' चित्रपटातलं पहिलं गाणं पाहून घ्या!!
‘माऊली’ म्हणजे लय भारीचा सिक्वल लवकरच रिलीज होणार आहे. माऊलीचा टीझर तर तुम्ही नक्कीच बघितला असणार!! काय म्हणता ? अजून नाही बघितला? मग इथंच तर टीझरही देत आहोत. लगेच बघून घ्या!!
तर, टीझरनंतर आज ‘माऊली’ चित्रपटातलं एक नवं कोरं करकरीत गाणं रिलीज झालंय राव. लय भारी मध्ये ‘माऊली’ गाण्याने महाराष्ट्राला वेड लावलेलं. माऊलीतल्या या नव्या गाण्यानेही अशीच जादू होईल. या गाण्याचं नाव आहे ‘माझी पंढरीची माय’. या गाण्याला जुन्या ‘माऊली’ गाण्यासोबत नवीन गाण्याची जोड असणार आहे.
राव, गाणं प्रेझेंट करताना खुद्द अजय-अतुल दिसत आहेत. अजय-अतुलच्या चाहत्यांसाठी हे मोठं सरप्राईज आहे. असंच आणखी एक सरप्राईज म्हणजे सिद्धार्थ जाधव. माऊलीसोबत तोही पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसतोय.
मंडळी, लय भारी प्रमाणे ‘माऊली’ चित्रपटही आपल्या गाण्याने मराठी मनावर जादू करेल यात शंका नाही. चला तर जास्त वेळ न दवडता हे सुंदर गाणं पाहून घ्या !!