computer

१ जानेवारीपासून हे ATM कार्ड्स होणार बंद...जाणून घ्या नवे कार्ड कसे मागवायचे ते !!

मंडळी, एक धक्कादायक बातमी आली आहे. १ जानेवारी २०१९ पासून काही ATM कार्ड्स/क्रेडीट कार्ड्स काम करणं बंद करतील, पण घाबरू नका चांगली बातमी पण आहे. तुम्ही बँकेत जाऊन नवीन कार्ड घेऊ शकता. चला तर समजून घेऊया ATM कार्ड्स/क्रेडीट कार्ड बंद का पडणार आहेत आणि बंद पडलेच तर ते बदलून कसे घ्यायचे.

स्रोत

मंडळी, रिझर्व बँकेच्या आदेशानुसार मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले सर्व कार्ड्स आता ब्लॉक केले जातील तर त्यांची जागा EMV (युरोपे, मास्टरकार्ड आणि विझा) चीप असलेले नवे कार्ड्स घेतील. रिझर्व बँकेने याबद्दल २७ ऑगस्ट, २०१५ रोजी आदेश दिला होता. १ सप्टेंबर, २०१५ पासून जारी केल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्ड मध्ये मग तो डेबिट, क्रेडीट असो वा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्ड असो EMV तंत्रज्ञान असणे बंधनकारक आहे. जुने मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड चलनातून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी ३ पेक्षा जास्त वर्षांची मुदत देण्यात आली होती. ३१ डिसेंबर, २०१८ रोजी ही मुदत संपणार आहे.

२०१५ ला आदेश मिळाल्यानंतर EMV तंत्रज्ञान असलेले नवीन कार्ड्स जारी करण्यात आले होते. आज बहुतेक सगळ्यांकडे EMV तंत्रज्ञान असलेले कार्ड्स आहेत, पण मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड्स पूर्णपणे बाद झालेले नाहीत.

EMV तंत्रज्ञान काय आहे ?

EMV हे जगभर लोकप्रिय झालेलं तंत्रज्ञान आहे. EMV चीप असलेले कार्ड जास्तीत जास्त सुरक्षित मानले जाते. मॅग्नेटिक स्ट्रीप कार्डची समस्या अशी होती की चोरट्यांना बनावट मॅग्नेटिक स्ट्रीप तयार करता यायची. त्याला क्लोनिंग (Cloning) म्हणतात. याउलट EMV कार्ड्सची बनावट प्रत तयार करता येत नाही.  स्कीमिंग पद्धतीने डाटा चोरणाऱ्यांना पण यामुळे आळा बसतो. समजा तुमचं कार्ड हरवलं तरी त्याचा वापर इतर कोणालाही करता येत नाही.

EMV तंत्रज्ञान असलेलं कार्ड कसं ओळखाल ?

मंडळी, जर तुम्हाला EMV तंत्रज्ञान असलेलं कार्ड ओळखायचं असेल तर ते फार सोप्पं आहे. या प्रकारच्या कार्डच्या डाव्या बाजूस सोनेरी रंगातील चीप दिसून येते.

कार्ड बंद पडल्यास काय कराल ?

कार्ड बंद पडल्यास लगेचच बँकेची शाखा गाठा. तिथे तुम्हाला सर्व प्रकारची मदत मिळेल. किंवा दुसरा एक मार्ग उरतो तो म्हणजे नेट बँकिंगचा. तुम्ही नवीन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी पुढील प्रक्रिया असेल.

समजा तुम्ही SBI चे ग्राहक आहात तर नवीन ATM कार्ड मिळवण्यासाठी ....

१. SBI च्या onlinesbi.com या वेबसाईटवर जा. तुमचा ID आणि पासवर्ड इन्सर्ट करून लॉगईन करा.

२. e-services वर क्लिक करा.

३. e-services वर क्लिक केल्यावर तुम्हाला एक मेन्यू दिसेल. त्यातून ATM card service वर क्लिक करा.

४. त्यानंतर Request ATM/Debit Card वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबपेज दिसेल.

५. नवीन पेजवर दिलेल्या ऑप्शन मधून तुमचे खाते निवडा. सोबतच तुमचं नाव आणि ATM कार्डच्या प्रकाराची निवड करा.

५. यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा. तुमचे नवे ATM कार्ड तुमच्या घरी पाठवले जाईल.

 

मंडळी,  अशाच प्रकारे तुम्ही इतर बँकांच्या वेबसाईट वरून नेट बँकिंग सेवेमार्फत नवीन ATM कार्ड मागवू शकता. तर मग जास्तीत जास्त सुरक्षित अशा EMV कार्ड लगेचच मागवून घ्या. SBI चं म्हणाल तर नवीन कार्डसाठी एक रुपयाही आकारला जात नाही. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या बँकेशी लगेच संपर्क करा.

मंडळी, स्कीमिंग प्रकाराने बऱ्याचदा ATM कार्ड मधून माहिती चोरली जाते. त्यासाठी समजून घ्या "ATM 'स्कीमिंग' म्हणजे काय ? ते कसे ओळखाल ? त्यापासून सावध राहण्यासाठी काय कराल ?"

सबस्क्राईब करा

* indicates required