computer

हंपी मध्ये जाऊन पाहायलाच हवीत ही ऐतिहासिक आणि अफलातून ६ ठिकाणं!!

न्युयॉर्क टाईम्स दरवर्षी त्या त्या वर्षात भेट दिलीच पाहिजे अशा महत्वाच्या ठिकाणांची एक यादी जाहीर करतं. यावर्षी त्यांनी ५२ ठिकाणांची यादी दिली आहे. राव, अभिमानाची गोष्ट म्हणजे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताच्या एका ठिकाणचं नाव आहे. कोणतं आहे हे ठिकाण ? या फोटोवरून काही अंदाज लागतोय का पाहा.

मंडळी, हे ठिकाण आहे कर्नाटकचं हंपी. भारतातील एक महत्वाचं पर्यटनस्थळ आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील एक अग्रगण्य ठिकाण. न्युयॉर्क टाईम्सच्या यादीत सामील झालेलं हंपी हे एकमेव भारतीय स्थळ आहे.

मंडळी, यानिमित्ताने तुम्हाला हंपीला जायची इच्छा होत असेल, तर आम्ही तुम्हाला एक छोटीशी मदत करू शकतो. (गाडीभाड्याचं विचारू नये) आम्ही तुम्हाला हंपी मध्ये बघण्यासारख्या ६ गोष्टींची यादी देत आहोत. हंपीला जाल तेव्हा तुमच्या बकेट लिस्ट मध्ये या गोष्टी असायलाच हव्या !!

१. प्राचीन मंदिरं आणि विजयनगर साम्राज्याचे अवशेष

इतिहासात हंपी गावाला श्रीमंत राजधानीचं शहर म्हटलंय. आज साम्राज्य जरी नसलं तरी त्याकाळची मंदिरे आणि अप्रतिम वास्तुकला आजही जिवंत आहे. या सर्व गोष्टी तर हंपीची ओळख आहेत.

२. रॉक क्लाइम्बिंग

राव, हंपी सारख्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग ? झटका बसला ना ? हंपी भागात प्रचंड आकाराचे दगड आढळतात. यामुळे रॉक क्लाइम्बिंगचं वेड असलेल्यांचं हे एक आवडतं ठिकाण आहे.

३. हिप्पी आयलंड

राव, नावावर जाऊ नका. हे एका लहानश्या विरूपा गड्डे नावाच्या बेटाचं टोपणनाव आहे.  भ्रमंती आवडणाऱ्याचं हे सर्वात आवडतं ठिकाण. या हिप्पी गावात लहानसहन झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये तुम्ही राहू शकता.

४. मातंगा हिल

मातंगा हिल ही अशी जागा आहे जिथून तुम्हाला संपूर्ण हंपीचं दर्शन घेता येतं. शिवाय एवढ्या उंचावर येण्याचा आणखी एक फायदा आहे. शिखरावर अत्यंत सुंदर वीरभद्र मंदिर आहे. तेही पाहण्याजोगं आहे.  

५. क्लिफ जम्पिंग

क्लिफ जम्पिंग म्हणजे सोप्प्या मराठीत ‘कड्यावरून उडी टाकणे’. तुम्हाला जर हा थ्रील अनुभवायचा असेल तर सनपूर नदी हे उत्तम ठिकाण आहे. हंपी फिरताना या जागी नक्की भेट द्या.

६. तुंगभद्रा नदीतील सफर

सिनेमात हिरो होडीतून फिरत फिरत गाणी म्हणतो ना तसाच फील तुंगभद्रा नदीच्या सफरीत घेता येईल. या नदीवरील बोटीदेखील एक वेगळा प्रकार आहे. वरील फोटो मध्ये याचं एक उदाहरण तुम्ही बघूच शकता. हंपीला जाणार असाल तर हा अनुभव एकदा घ्यायलाच हवा !!

 

मंडळी, याखेरीज तुम्ही हंपी गावात खरेदीला जाऊ शकता. जर तुम्ही मित्रांसोबत किंवा एकटेच दुचाकीवर हंपी फिरायला गेलात तर आणखी बहार येईल. मग कधी करताय हंपीचं प्लॅनिंग ??

 

 

आणखी वाचा :

भारतात आहेत ही १३ जागतिक वारसा स्थळं. यातल्या किती ठिकाणांना तुम्ही भेट दिलीय??

सबस्क्राईब करा

* indicates required