computer

काय आहे 10 year challenge ? मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का ?

राव, वर्ष सुरु होऊन १७ दिवस झालेत आणि तोच एक नवीन टूम निघाली आहे. तुम्हाला किकी चॅलेंज आठवतच असेल, असाच एक नवीन चॅलेंज सध्या व्हायरल होतो आहे. हा चॅलेंज आहे #10yearchallenge.

म्हणजे बघा, एका बाजूला तुमचा २००९ सालचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला तुमचा आत्ताचा फोटो असा कोलाज करायचा आहे. (हा कोलाज कम मिम जास्त वाटू शकतो. पण असो) या १० वर्षांमध्ये तुमच्यात किती बदल झाला हे या चॅलेंजमुळे समजेल. शिवाय जुने दिवस पण आठवतील.

स्रोत

किकी चॅलेंज जसा हॉलीवूडच्या कॉमेडीयनने सुरु केला होता तसा हा चॅलेंज कोणी सुरु केला आहे याबद्दल माहिती मिळालेली नाही. पण या मागे खुद्द फेसबुक असल्याचं सांगितलं जात आहे. अहो फेसबुक नाही का आपल्या जुन्या पोष्टी आपल्याला दाखवून शेअर करा म्हणतं. या चॅलेंजचं मूळ त्यातच आहे.

तर, हा फॅड जसा लोकांमध्ये हिट होतोय तसाच तो सेलिब्रिटीजना पण भुरळ घालतोय. चला तर यानिमित्ताने पाहूयात मराठी कलाकारांनी शेअर केलेले त्यांचे १० वर्षापूर्वीचे फोटो.

सबस्क्राईब करा

* indicates required