ATM वर डल्ला मारण्याची चोराची जगावेगळी पद्धत...पाहा बरं काय केलंय त्याने !!

आजवर अनेक पद्धतीने चोरांनी ATMवर डल्ला मारलेला आहे. अशीही काही प्रकरणं घडली आहेत जिथे चोरांनी थेट ATM मशीन उचलून नेली. त्यातल्या त्यात धूर्त पद्धत म्हणजे ‘स्किमिंग’. आज आम्ही ज्या चोराविषयी सांगणार आहोत त्या चोराने आजवरची सगळ्यात हटके पद्धत वापरून तब्बल १.५ लाख रुपये लंपास केले आहेत.

काय आहे त्याची पद्धत ?

स्रोत

हर्ष पटेल असं या चोराचं नाव. गुजरातच्या चांदखेडा येथील ATM मशीन मधून त्याने चोरी केली आहे. या महाभागाने ATM मशीनच्या withdrawal slot मध्ये बोटे घालून एक एक नोट बाहेर काढली होती. आपण बघितलं असेल की पैसे बाहेर येताना slot चं दार उघडण्याचा आवाज येतो, मग पैसे बाहेर येतात. हे महाशय त्या दाराला बंद होऊ देत नसत. अशा प्रकारे त्याने लाखो रुपये लंपास केले. जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत त्याचं हे चौर्यकर्म चालू होतं.

हे चोरलेले पैसे त्याच्या खात्यातून कधीच कमी झाले नाहीत. युनियन बँकेचे कर्मचारी मात्र हिशोब लागत नसल्याने गोंधळात होते. याचा तपास घेत असताना बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. तेव्हा कुठे हा प्रकार उघडकीस आला. हर्ष पटेल आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

स्रोत

मंडळी, ही तर झाली भुरट्या चोराची पद्धत, पण स्कीमिंग या पद्धतीने आजवर सर्वाधिक चोऱ्या झाल्या आहेत. ही पद्धत काय आहे ? त्यापासून कसं वाचायचं यासाठी आमचा खालील लेख वाचा.

ATM वर डल्ला : ATM 'स्कीमिंग' म्हणजे काय ? ते कसे ओळखाल ? त्यापासून सावध राहण्यासाठी काय कराल ?

 

आणखी वाचा :

एटीएम, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड वापरता? मग या चार गोष्टी तुम्ही कधीच करू नका...

जाणून घ्या नक्की कसं चालतं ATM !!

ATM मधून फाटकी नोट आली तर काय कराल ?...बघा बरं पटपट !!

सबस्क्राईब करा

* indicates required