नवऱ्याच्या जुन्या पासपोर्टचा वापर या बाईंनी कसा केला पाहा...जुगाडाची हाईट आहे राव !!
काटकसर काय असते ती भारतीय गृहिणींकडून शिका. प्लास्टिकच्या पिशव्या कितीही जमा झाल्या तरी त्या कचऱ्यात न जाता गादी खाली ठेवल्या जातात. का ? तर, त्या पुढे वापरता येतील. हिशोब लिहिण्यासाठी कॅलेंडरचा पण वापर होतो. कारण उगाच चांगला कागद वाया का घालवायचा. हे तर काहीच नाही, नुकतंच एका बाईंनी तर प्रतापच केला. त्यांनी नवऱ्याच्या जुन्या पासपोर्टचा वापर टेलिफोन डायरेक्टरी म्हणून केला आहे. हा पाहा व्हिडीओ
राव, जुना पासपोर्ट कधीपर्यंत निरुपयोगी पडून राहणार. या बाईंनी त्याला सत्कारणी लावलंय. त्यांनी फोन नंबर तर लिहिलेच आहेत, पण शेवटच्या उरलेल्या जागेचा वापर रोजच्या सामानाचा हिशोब लिहिण्यासाठी केला आहे.
मंडळी, केरळच्या एका व्यक्तीने स्वतःच्याच आईचा हा पराक्रम फेसबुकद्वारे जगासमोर आणला. असा कमाल जुगाड व्हायरल झाला नसता तरच नवल. सध्या लोकांनी हा व्हिडीओ डोक्यावर घेतला आहे.
राव, तुमच्याकडे जुगाडाचा असा भन्नाट किस्सा आहे का ? असेल तर नक्की शेअर करा !!