computer

टेन्शन आल्यावर लघवीला का लागते ? वाचा त्या मागचं वैज्ञानिक कारण !!!

मंडऴी, तुम्हाला तुमच्या लहानपणी स्टेजवर पहिल्यांदा भाषण करताना किंवा दहावीचा पहिला पेपर लिहिताना जोराची लघवीला लागली होती का? नाही नाही, फार सीरीयस नाहीये राव. हे तर अगदी नॉर्मल आहे हो. किंबहुना आपण सगळ्यांनीच हे पाहिलेलं असतं की खूप ताण आला, टेन्शन आलं की जोराची ‘लघवी’ला लागते. पण असं का होतं बुवा? ह्याबाबत शास्त्रज्ञांनी अनेक थिअरीज मांडल्या आहेत. त्यापैकी काही आपण समजून घेऊया......

थिअरी नं.१

आपण कोणत्याही ताणाला ३ टप्प्यांमधे सामोरे जातो. ते टप्पे Alarm Stage, Resistance Stage आणि Exhaustion Stage  ह्या नावांनी ओळखले जातात. पहिल्या टप्प्यात आपल्याला ताणाची जाणीव होते आणि आपल्या शरीरातील ‘Fight Or Flight’ म्हणजेच जिंकू किंवा मरु ही संवेदना जागृत करणारं ‘Adrenaline’ हे संप्रेरक(‘Hormone’) सक्रिय होतं. त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व स्नायू ताठरतात. परिणामी मूत्राशयावर दबाव येतो व आपल्याला ‘लघवी’ला लागते.

थिअरी नं.२

जेव्हा आपल्याला ताणाची जाणीव होते, तेंव्हा आपण आपलं शरीर आणि शारिरीक क्रियांबाबत जास्त सजग होतो. त्याचाच हा परिणाम असतो असंसुद्धा शास्त्रज्ञ म्हणतात.

पण मुख्य प्रश्न असा आहे की अशा वेळी करायचं काय???? तर यावर उपाय आहे भाऊ!! ह्या उपायांवर एक नजर टाकूया....

१) अनेक मानसशास्त्रज्ञ ह्या प्रश्नावर सीबीटी(Cognitive Behavioral Therapy) हा उपाय सुचवतात. या सीबीटीमध्ये आपल्या वागण्यात बदल घडवून समस्या कशा सोडवल्या जाऊ शकतात यावर भर दिलेला असतो. तर या ताणाच्या वेळी लघवीला लागण्यावरच्या ह्या थेरपीमधे ताण कसा आटोक्यात ठेवावा, ताणाच्या स्त्रोतांची तीव्रता कशी कमी करावी ह्याचे प्रशिक्षण दिले जाते. ह्यामुळे शरीरावरील ताण कमी होण्यास मदत होते.

२) काही शास्त्रज्ञांच्या मते दीर्घ श्वसनाने हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. तसंच कमरेचे व्यायाम केल्यानेसुद्धा फायदा होऊ शकतो.

३) ह्या उपायांनंतरसुद्धा गुण न आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required