अखेरीस बाँबे हायकोर्टचे नाव बदलले.

बॉम्बेचे मुंबई होऊन आता बराच काळ झालाय. पण हायकोर्टाचे नाव काही बदलेले नव्हते. गेले अनेक वर्ष राजकीय पक्षांची ही मागणी होतीच. बॉम्बे विरुद्ध मुंबई या वादात हायकोर्टाचे नाव बऱ्याच वेळा चर्चिले जायचे. पण आज केन्द्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हायकोर्टाचे नाव मुंबई करण्यात आलं. मुंबई सोबत मद्रास (चेन्नई) व कलकत्ता (कोलकत्ता) हायकोर्टाचे नाव बदलण्यास मंजूरी देण्यात आली आहे. आता यावर राष्ट्रपतींची सहीच ती काय व्हायची बाकी आहे. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required