या बेटावरच्या लोकांना चक्क घड्याळ नकोय, काय कारण असावं यामागचं?

एका बेटावरच्या लोकांना चक्क घड्याळ नकोय!! आश्चर्य वाटलं ना? आजच्या घडीला सेकंद, मिनिटे, तास, या  हिशेबांशिवायच्या जगण्याची कल्पना तरी आपण करु शकतो का?  सध्याचे सगळे जग घड्याळाच्या काट्याबरोबर फिरतेय. अनेक शहरांमध्ये शहराच्या मधोमध घड्याळांचे वॉच टॉवर आहेत. कधी ती घड्याळ बंद पडली तर त्याचीही बातमी होते.  कारण लोकांचे सगळे वेळापत्रक कोलमडून पडते. आपण या घड्याळाच्या काट्यांच्या इतके अधीन झालो आहोत की त्याशिवाय जगणेच अशक्य आहे.  पण एका देशातल्या लोकांनी चक्क टाइम फ्री झोनची मागणी केली आहे. कोणता देश आहे तो आणि अशी विचित्र मागणी होण्यामागे काय कारणे आहेत हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल. चला तर मग जाणून घेऊया या अफलातून गोष्टीबद्दल...

नार्वे देशात अनेक बेटं आहेत.  त्यापैकी एका बेटाने ही मागणी केली आहे. तर, आर्क्टिककडच्या वेस्ट ट्रोम्सोच्या सोमारो लोकांनी अशी मागणी केली आहे. नॉर्वे बेटं म्हणजे एकदम उत्तर ध्रुवाजवळचा, मध्यरात्रीच्या सूर्याचा देश. इथं वर्षातले ६९ दिवस सूर्य मावळतच नाही आणि रात्रीची परिस्थिती काही वेगळी नाही. काही रात्री खूप थंड आणि महिनोनमहिने चालणाऱ्या लांबलचक असतात.  म्हणून या उपलब्ध  वेळेचा जास्तीतजास्त सदुपयोग व्हावा म्हणून त्यांनी ही मागणी केली आहे. म्हणजे त्यांना शाळा आणि ऑफिसेस कितीही वेळ चालवता येतील, काळोख्या हिवाळी रात्रींत बुडणारा अभ्यास आणि इतर कामे करता येतील. थोडक्यात,  बेटावरच्या  लोकांना कधीही काहीही करता यायला हवेय. त्यांना मनसोक्त जगता यावे म्हणून टाइम फ्री झोनची मागणी करण्यात आली आहे. 

(हे तिथले उन्हाळ्यातल्या रात्रीचं दृश्य आहे- स्रोत)
महिनोनमहिने सूर्यप्रकाश असल्यावर सततच्या उजेडाला कंटाळून म्हणा, पण लोक लै कंटाळतात. मग ते कधी रात्री खेळतात, पाण्यात डूंबतात. तर जेष्ठ लोक मस्त लॉनवर पहुडलेले असतात.  तुम्हीही विचार करा, सतत सव्वादोन महिने सूर्य मावळला नाही, लख्ख उजेडच असेल, तर तुम्ही इतके दिवस आणि इतक्या रात्री काय कराल?  


मंडळी,  त्यांचा दावा पटण्यासारखा असला तरी त्याच्यावर काय निर्णय होतो हे बघणे रंजक ठरणार आहे... जर तसे झाले तर मात्र हा जगातला सर्वात पहिला टाईमफ्री झोन ठरणार आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required