computer

नासाने काढलेला हा ज्वालामुखीचा फोटो पाह्यलात का? कुठे झाला हा स्फोट?

 अवकाशातले फोटो कुणाला आवडत नाहीत? वेगवेगळ्या अँगलने आकाशात घडणाऱ्या घडामोडी आपल्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चढाओढ लागलेली दिसते. पण सर्वात जास्त आकर्षित करतात ते शास्त्रज्ञांनी काढलेले आकाशाचे फोटो!!! जमिनीवरुन दिसणारे आकाश आणि प्रत्यक्षातले आकाश यात किती फरक आहे ते बघण्याची मजाच न्यारी असते राव!! दर काही दिवसांनी एकतरी भन्नाट फोटो आकाशातून येत असतो. या फोटोंमुळे अवकाश, आकाशगंगा या सगळ्या गोष्टींबद्दलचे आपले आकर्षण वाढतच जाते. 

कुरील बेट..

काही दिवसांपूर्वी आलेला ब्लॅक होलचा फोटो पण असाच एक अफलातून नमुना होता. सध्या अजून एक फोटो सगळ्यांचे ध्यान आकर्षित करत आहे. पण  तो फोटो आकाशातला नाहीय मंडळी!! तो आपल्या पृथ्वीवरचाच आहे. पण तो फोटो अनेकार्थाने स्पेशल आहे राव!! इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या शास्त्रज्ञांनी काढलेला हा फोटो नेटकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय झाला आहे.

उत्तर पॅसिफिक महासागरातल्या कुरील आईसलँडवरचा एक निद्रिस्त ज्वालामुखी जागृत झाला आणि त्याचे फोटो लगोलग तुफान वायरल व्हायला सुरुवात झाली. कारण पण तसेच आहे राव!! हा ज्वालामुखी तब्बल ९५ वर्षांनी जागृत झाला आहे. या ज्वालामुखीच्या परिसरात इतरही ज्वालामुखी आहेत. कामचटका पेनिनसुला, रायकोक वोल्कॅनो असे जागृत ज्वालामुखी त्या परिसरात आहेत. हे ज्वालामुखी अधून मधून आग ओकत असतात. पण कुरील बेटावरचा हा ज्वालामुखी कधीकधी जागृत होत असतो. मागच्या वेळी तो १९२४ साली जागृत झाला होता. आणि त्याच्यापण आधी तो १७७८ मध्ये जागृत झाला होता. यावर्षी २२ जूनला ही शांतता संपली आणि जेव्हा या ज्वालामुखीने मोठ्या प्रमाणावर आग ओकायला सुरुवात केली. 

या घटनेची माहिती झाल्याबरोबर शास्त्रज्ञांनी त्याचे फोटो घ्यायला सुरुवात केली. सुरवातीला छोटयाशा जागेतून बाहेर पडत असलेला लाव्हारस मात्र नंतर सगळ्या परिसरात पसरला. या परिसराला अंब्रेला रिजन म्हणण्यात येते.  हा फोटो वायरल झाल्यावर लोकांमध्ये सुरवातीला असलेले कुतूहल नंतर मात्र काळजीत परिवर्तित झाले. या ज्वालामुखीमुळे काही चुकीचे परिणाम तर होणार नाहीत ना यासारखे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले. 

या घटनेनंतर वोल्कॅनिक ॲश एडवायजरी कमिशनने सांगितले की, या ज्वालामुखीचा प्रभाव समुद्र सपाटीपासून १३ किलोमीटर वर आहे. म्हणून या परिसरातून जाणाऱ्या विमानांनी काळजी घ्यावी.

सबस्क्राईब करा

* indicates required