computer

या खेळाडूने भारताला मिळवून दिलंय जागतिक वुशू चॅम्पियन्स स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक !!

मंडळी, आज निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे. सगळीकडे निवडणुकीत कोणी बाजी मारली याच्याच बातम्या येत आहेत. या सगळ्या गदारोळात एक बातमी मागे पडण्याची शक्यता आहे. ती म्हणजे जागतिक वुशू चॅम्पियन स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक कमावलं आहे.

प्रवीण कुमार या खेळाडूने हे पाहिलं सुवर्णपदक भारताला मिळवून दिलं आहे. २-१ या फरकाने त्याने खेळात बाजी मारली. यावेळचा हा व्हिडीओ पाहा.

वुशू सांडा नावाचा हा खेल मार्शल आर्ट्सचाच एक प्रकार आहे. यात रेसलिंग, किकबॉक्सिंग हे प्रकार समाविष्ट असतात. २०१७ साली पूजा काडीयन ही खेळाडू भारतातली पहिली वुशू चॅम्पियन होती. आज २ वर्षांनी याच स्पर्धेत प्रवीण कुमारने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

भारतासाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. निवडणूक निकालांच्या ओघात प्रवीणचं कौतुक करायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required