computer

'देश की नई दुकान'मध्ये जिओवाल्यांना ३००० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो?

टेलीकॉम क्षेत्र काबीज केल्यानंतर रिलायन्स जिओ आता ‘ऑनलाईन किराणा’ विक्रीच्या क्षेत्रात येत आहे. आजच जिओचं ‘जिओमार्ट’ लाँच झालं. जिओमार्टला ‘देश की नई दुकान’ म्हटलं जात आहे.  सध्या चाचणीकरिता कल्याण, नवी मुंबई आणि ठाण्याच्या ग्राहकांसाठी जिओमार्ट सुरु करण्यात आलं आहे.

आजच्या लेखात आपण जिओमार्टबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

काय काय असेल जिओमार्टमध्ये ?

जिओमार्टमध्ये तब्बल ५०,००० प्रॉडक्ट्स उपलब्ध करण्यात आले आहेत. यात साबण, शाम्पू, सारख्या रोजच्या घरगुती गोष्टींचा समावेश असेल. कल्याण, नवी मुंबई आणि ठाण्याच्या नागरिकांसाठी प्री-रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलेलं आहे. यासाठी https://www.jio.com/jiomart या लिंकवर जा.

ग्राहकांच्या दृष्टीने फायद्याचे असतील असे काही नियम जिओमार्टमध्ये ठेवण्यात आले आहेत. जसे की, किराणामाल मोफत घरपोच आणून दिला जाईल. त्यासाठी खरेदीची  कोणतीही अट असणार नाही. खरेदी केलेली वस्तू जर परत करायची असेल तर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. एक्सप्रेस डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे.

आता कंपनी जिओच्या मालकीची असल्यामुळे पहिला मान हा जिओ ग्राहकांना देण्यात आलाय. जिओच्या ग्राहकांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. लवकरात लवकर रजिस्टर करणाऱ्या ग्राहकांना ३००० पर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.

जिओमार्टची काम करण्याची पद्धत कशी असेल ?

जिओमार्ट हे ऑनलाईन टू ऑफलाईन (O2O) असणार आहे. म्हणजे स्थानिक विक्रेत्यांकडून घेऊन ऑनलाईन विकलं जाईल. जिओमार्ट बाजारात आल्याने जे विक्रेते ऑनलाईन विक्री करत नाही त्यांना सुद्धा ऑनलाईन ग्राहकांपर्यंत पोहोचता येणार आहे.

रिलायन्स जिओ जिओमार्टसाठी २ वर्षापासून प्रयत्न करत होतं. येत्या नवीन वर्षात जिओमार्ट अखेर येणार आहे. याचा फटका सध्या बाजारात असलेल्या अमेझॉन प्राईम, बिगबास्केट  आणि ग्रोफर्स  सारख्या कंपन्यांना बसेल. जिओने टेलिकॉम क्षेत्रात ग्राहकांसाठी जशा नवनवीन ऑफर्स आणल्या तशा जर जिओमार्टच्या ग्राहकांसाठी आणल्या तर ग्राहकांसाठी मात्र ही पर्वणीच ठरेल.

तुम्ही जर कल्याण, नवी मुंबई, ठाण्यात राहत असाल तर आजच रजिस्टर करून घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required