computer

'कोरोनाव्हायरस'बद्दल असलेल्या १० अफवा...या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवलाय का?

कोरोना व्हायरस आणि त्यामुळे होणाऱ्या COVID-19 आजाराबद्दल सध्या अनेक अफवा पसरल्या आहेत. आजच्या लेखात आम्ही अशा १० अफवांबद्दल माहिती देणार आहोत.

१. कुत्रा किंवा मांजरासारख्या पाळीव प्राण्यांना कोरोनाची बाधा होऊ शकते का?

हॉंगकॉंगमधल्या एका कुत्र्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर अशी अफवा पसरली, की कुत्र्यांनाही कोरोना होऊ शकतो.  पण खरं तर ही शक्यता फार कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की कुत्रा किंवा इतर कोणताही पाळीव प्राणी कोरोना विषाणूचा प्रसार करू शकत नाही.

२. कोरोना विषाणू वटवाघूळांमुळे पसरला.

चिनी लोकांनी वटवाघूळ खाल्याने कोरोना विषाणू माणसांमध्ये पसरला, अशी सगळ्यांचीच समजूत झालेली आहे. पण हा दावा खरा आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
याबाबतीत दोन मतप्रवाह आहेत. काही संशोधक म्हणतात, की कोरोना विषाणू वटवाघूळांकडून पॅन्गोलिन प्राण्यामध्ये गेला आणि मग माणसांमध्ये पसरला. काही संशोधकांचं मत आहे की कोरोना विषाणूचं केंद्र असलेल्या वूहान येथे मिळणाऱ्या सापांमधून कोरोना विषाणू पसरला. 

काही का असेना, पण एक ठाम मत अजून तयार झालेलं नाही.

३. 'क' जीवनसत्व कोरोनावर मात करू शकतं का?

कोरोनावर मात करणारं कोणतंही औषध सध्या उपलब्ध नाही. एवढंच काय कोरोना विषाणूचा जुळा भाऊ असलेल्या SARS रोगावरील औषधांचाही कोरोनावर परिणाम होत नाही.

४. आयुर्वेद, होमिओपॅथी आणि इतर औषधी वनस्पतींमुळे COVID-19 आजार बरा होतो.

आयुर्वेद किंवा इतर उपचार पद्धतींनी कोरोना बरा होतो याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

५. उन्हाळ्यात कोरोना विषाणू टिकू शकणार नाही.

कोरोना हा SARS आणि MERS आजाराचा भाऊबंद आहे. या दोन्ही आजारांना हिवाळा अनुकूल असतो, पण याचा अर्थ कोरोनाही याच नियमाप्रमाणे उष्णतेत टिकू शकणार नाही हे ठामपणे म्हणता येणार नाही. तसा वैज्ञानिक पुरावा अजून तरी मिळालेला नाही.

६. गरम पाण्याने अंघोळ केल्यास किंवा गरम पाणी प्यायल्यास कोरोना विषाणूला संपवता येतं

COVID-19 ची लक्षणे काय आहेत ती आधी समजून घ्या. ताप, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी सारखी लक्षणे दिसतात. गरम पाणी पिण्याने तुम्हाला बरं वाटेल, पण कोरोना पूर्णपणे बरा होणार नाही.

७. वृद्ध माणसांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे.

हे अगदी बरोबर आहे, पण इतरांनीही काळजी घ्यायला हवी. विशेषतः ज्यांना यकृत, मूत्राशयाचा आजार आहे, तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनीही खास काळजी घ्यायला हवी. तरुण आणि जे सुदृढ आहेत त्यांनी लोकांपासून अंतर राखून राहायला हवं.  

८. लसूण खाल्ल्याने COVID-19 बरा होतो?

या अफवेला वैज्ञानिक आधार नाही. 

९. चीनवरून काहीही मागवू नये.

कोरोना विषाणू विषयी जी माहिती पसरली आहे त्यातली एक माहिती म्हणजे - कोरोना विषाणू हवेत ३ तास राहू शकतो, तर तांब्याच्या धातूमध्ये ४ तास आणि कार्डबोर्डमध्ये २४ तास राहू शकतो. प्लास्टिक आणि स्टीलच्या भांड्यात २ ते तीन दिवस राहू शकतो.

या माहितीला वैज्ञानिक आधार नाही. कोरोना विषाणू वस्तूंसोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो हे अजून सिद्ध झालेलं नाही.

१० मांसाहार केल्याने कोरोना विषाणू पसरतो?

चिकन, मटण, मासे खाल्याने कोरोना विषाणू पसरत नाही. कोरोना विषाणू केवळ एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरतो.

तर मंडळी, ह्या १० प्रश्नांची उत्तरे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.  तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा.

सबस्क्राईब करा

* indicates required