computer

शवपेटी घेऊन नाचणारी पोरं फेमस होत आहे, पण हे लोक आहेत तरी कोण ?

शवपेटी घेऊन नाचारणारे लोक पाहिले का? या प्रकारचे ३-४ व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. त्यांचा वापर करून अफलातून मिम्स तयार होत आहेत. पण तुम्हाला प्रश्न पडला का, चक्क शवपेटी घेऊन कोणी का नाचेल? हे कुठे घडलंय, की हे सगळं नाटक आहे.

याचा शोध घेतल्यानंतर आमच्या हाती जी माहिती लागली ती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

हा व्हिडीओ घाना देशातला आहे. तिथल्या प्रथेप्रमाणे मृताला असं नाचत गात नेलं जातं. मृताची शेवटची यात्रा धूमधडाक्यात व्हावी अशी तिथल्या लोकांमध्ये समजूत आहे. ही प्रथा आजही तितक्याच जोरदार पद्धतीने चालत आहे. नाचणाऱ्या शववाहकांना प्रचंड मागणी आहे. हे शववाहक नाचतात, उड्या मारतात, शवपेटी जमिनीवर ठेवून कलाबाजी दाखवतात. एवढंच नाही तर शवपेटी हवेत फेकून ती झेलतात. हे काण्यासाठी त्यांना पैसाही चांगला मिळतो.

आज जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ते २०१५ आणि २०१७ सालीही व्हायरल झाले होते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मागे जे गाणं ऐकू येतं तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या गाण्यामुळे व्हिडिओ आणखी विनोदी वाटतो. मूळ व्हिडिओत हे गाणं नव्हतं. ते नंतर जोडण्यात आलं. गाण्याचं नाव आहे astronomia.

कशी वाटली ही माहिती? शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required