भारतात बनलेली पहिली कार कोणती होती माहित आहे? तुमचा अंदाज नक्कीच चुकेल पाहा..
आजच्या घडीला कार सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. अगदी महागड्या गाड्या परवडत नसल्या तरी लोकांकडे गेलाबाजार नॅनो, मारुती ८०० किंव अल्टो तरी असतात. स्वत:कडे नसली तरी जवळच्या कुणाकडे कार नक्कीच असते. ही कार नावाची वस्तू गेली किमान ७० वर्षं रस्त्यांवर फिरतेय.
आता जरी भारतातल्या खेड्यापाड्यांमध्येही कार दिसायला लागल्या आहेत. पण एकेकाळी अगदी मोजक्या गाड्या रस्त्यांवर फिरत असत. भारतात पहिली कार जमशेदजी टाटांनी घेतली हे सगळ्यांना माहीत असतं, पण भारतात पहिली कार केव्हा, कुठे आणि कशी तयार झाली हे मात्र खूप कमी लोकांना माहित असते. चला तर मग जाणून घेऊया भारतातल्या पहिल्या कारबद्दल!!!
अनेकांना लँडमास्टर ही भारतातील पहिली कार वाटते, तर काहींना प्रीमियर पद्मिनी. पण यांपैकी कुठलीच कार ही भारतातील पहिली कार नव्हती. तर ती होती हिंदुस्थान १०!! ब्रिटनच्या मॉरिस-१० सिरीजला रिबॅज करून हिंदुस्थान मोटर्सने ही कार तयार केली होती. गुजरातमधल्या ओखा बेटावर १९४९ साली कारचे काम करण्यात आले होते.
त्यावेळी ही कार ताशी १००किलोमीटरच्या वेगाने धावू शकत असे. तशी ही कारही भक्कम होती. नंतरच्या काळात भारतात अनेक परदेशी कार्स आल्या. तसेच भारतातही अनेक कंपन्या कारनिर्मितीमध्ये उतरल्या. पण हिंदुस्थान मोटर्सने भारताच्या इतिहासात या कारच्या माध्यमातून भारताच्या इतिहासात स्वतःचे नाव कोरले हे मात्र नक्की!!