भांडी धुण्याची कटकट मिटवणारा डिशवॉशर घ्यायचा विचार करताय? खरेदी करण्याआधी हे नक्की वाचून घ्या...
लॉकडाऊनमुळं रोजचा भांड्यांचा ढिगारा घासणं मोठं आव्हान होऊन बसलंय. पण जसं रोजरोज कपडे धुवून वैतागलेल्या महिलावर्गाचे कष्ट वॉशिंग मशीनमुळे कमी झाले, अगदी त्याच पध्दतीने नाना तऱ्हेच्या अन्नपदार्थांचे डाग पडलेली भांडी चकचकीत घासून-धुवून देणारं डिशवॉशर यंत्रही गृहिणींसाठी खूपच मदतीचं ठरतंय.
भारतीय पध्दतीच्या जेवणाचे हट्टी डागही अगदी आरामात स्वच्छ करणारं हे यंत्र सद्याच्या व्यापाच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या किचनमध्ये आवर्जून असायला हवं. काहीजणांनी हे यंत्र पाह्यलं-वापरलं असलं तरी या यंत्राची थोडक्यात माहिती आपण पाहू.
दिसायला हे मशीन थोड्याफार फरकाने वॉशिंग मशीनसारखं दिसतं. मात्र वॉशिंग मशीनमध्ये एकाच मोठ्या ड्रममध्ये आपण कपडे टाकतो, तसं इथं करत नाही. डिशवॉशरमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यांसाठी वेगवेगळे कप्पे दिलेले असतात. लहानसहान चमच्यांपासून ते प्लास्टिक बॉटल, चहाचे कप, तवा, पातेली अशी कोणतीही भांडी यात धुता येतात. त्याचसोबत या यंत्रामध्ये खास डिशवॉशरसाठी बाजारात मिळणारा साबण, डिटर्जंट पावडर आणि जड पाण्यासाठी मीठ घालण्याची वेगवेगळी व्यवस्था दिलेली असते. या तिन्हीऐवजी तुम्ही तिन्हींची एकत्र क्षमता असलेली डिशवॉशर टॅब्लेटही वापरू शकता. मात्र उचललं भाडं आणि सिंकमध्ये ठेवलं हा प्रकार इथं चालत नाही. भांड्यांतलं उरलेलं अन्न स्वच्छ करून ती भांडी डिशवॉशरमधल्या ट्रेमध्ये रचावी लागतात. यंत्र सुरू केल्यानंतर कमीतकमी पाणी आणि विजेचा वापर करत हे यंत्र अर्धाएक तासात आपली भांडी चमकवून देतं. वॉशिंग मशीनसारखंच भांड्यांच्या संख्येनुसार आपल्याला हवा प्रोग्रॅम निवडून आपण भांडी धुण्याची वेळ कमी जास्त करू शकतो.
जर तुम्हीही हा डिशवॉशर घरी आणण्याच्या विचारात असाल तर इथं आम्ही काही डिशवॉशर्सची यादी देत आहोत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमीअधिक क्षमतेचा डिशवॉशर खरेदी करू शकता.
Voltas Beko 8 Place Table Top Dishwasher
८ प्लेस म्हणजेच हा डिशवॉशर एकावेळी ८ लोकांच्या जेवणाची भांडी किंवा ९६ लहान-मोठी भांडी स्वच्छ करू शकतो. भारतात लॉन्च झालेला ८ प्लेसचा हा पहिलाच लहान डिशवॉशर आहे. छोटा आकार असल्यानं तुम्ही तो टेबलावर किंवा किचनमध्ये कुठेही छोट्या जागेत ठेवू शकता. लहान आकाराची कढईसुध्दा यात ठेवता येते. यामध्ये तुम्हाला वर-खाली असे २ स्प्रे आर्म्स आणि २ ट्रे मिळतात.
किंमत - ₹ २१३९०
पाण्याचा वापर - ८ ते १२.५ लीटर
वॉश प्रोग्रॅम्स - ६ (इंटेन्सीव्ह, नॉर्मल, इको, ग्लास केअर, क्लिन ॲन्ड शाईन, मिनी ३०)
पाण्याचं तापमान - ७०° सेल्सिअस
वॉरंटी - २ वर्षे (मोटरसाठी ५ वर्षे)
AmazonBasics 12 Place Setting Dishwasher
६ ते ८ जणांच्या कुटूंबासाठी हा डिशवॉशर चांगला पर्याय आहे. कमी भांडी असल्यास यात पाणी, साबण आणि डिटर्जंटची बचत करणारा 'हाफ लोड' प्रोग्रॅम दिलेला आहे. भांड्यावर पाण्याचे डाग राहू नयेत यासाठी एक्स्ट्रा ड्राईंगची सुविधाही यात आहे. त्यासोबत घरी लहान मुलं असतील तर याचा चाइल्ड लॉक पर्याय तुमच्या कामी येईल.
किंमत - ₹ २८९९९
पाण्याचा वापर - ११ लिटर
वॉश प्रोग्रॅम्स - ७
वॉरंटी - २ वर्षे (मोटरसाठी ५ वर्षे)
IFB Neptune VX Fully Electronic Dishwasher
१२ प्लेस सेटिंगसोबत येणारा हा डिशवॉशर A++ एनर्जी एफिशिअन्सीमुळं विजेची बचत करतो. लहान कप, उंच ग्लास, मोठे तवे अशी वेगवेगळ्या आकाराची भांडी यात स्वच्छ करता येतील. सोबत यात 'हाफ लोड' प्रोगॅमही दिलेला आहे.
किंमत - ₹ ३७९९०
पाण्याचा वापर - ९ लीटर
वॉश प्रोग्रॅम्स - ८
वॉरंटी - २ वर्षे
Neptune SX1 15 Place Setting Dishwasher
A++ एनर्जी एफिशिअन्सीसोबत येणारा IFB कंपनीचा हा डिशवॉशर 15 सेटिंग्जमुळे एकाचवेळी जास्त संख्येने भांडी स्वच्छ करण्यासाठी चांगला पर्याय आहे. यातल्या भांडी ठेवण्यासाठीच्या बास्केटची उंची कमी जास्त करता येते आणि रॅक्सही फोल्ड करता येतात. यामध्येही तुम्हाला 'क्विक वॉश' आणि 'हाफ लोड'चा पर्याय मिळतो.
किंमत - ₹ ४४६४१
पाण्याचा वापर - ९ लीटर
वॉश प्रोग्रॅम्स - ८
वॉरंटी - २ वर्षे
LG Free-standing 14 Place Setting Dishwasher
अधिक जागा आणि अधिक तंत्रज्ञानानं युक्त अशा या LG च्या डिशवॉशरमध्ये स्मार्ट रॅक मिळतं. हे रॅक भांड्यांच्या आकारानुसार हवं तसं ॲडजस्ट करता येतं. LED डिस्प्ले, एक्स्ट्रा हॉट, चाइल्ड लॉक, टाईम डिले, क्विक वॉश, ऑटो रिस्टार्ट, ट्रिपल फिल्टर अशा सर्व सुविधांनी युक्त असा हा डिशवॉशर आवाजही कमी करतो आणि विजेची बचतही करतो.
किंमत - ४७९९०
पाण्याचा वापर - १५ लिटर
वॉश प्रोग्रॅम - ५
वॉरंटी - २ वर्षे (इन्व्हर्टर डायरेक्ट ड्राईव्ह मोटरसाठी १० वर्षे)
आता जे आहे ते आम्ही तुमच्यासमोर मांडलं आहे. किंमती थोड्या जास्त वाटत आहेत पण पुढच्या भविष्याचा विचार करता आणि सतत दांड्या मारणारी कामवाली घरी असेल, किंवा तुम्ही "आत्ता होतात" म्हणून भांडी स्वत:च धुवत असाल, घरी खूप लोक असतील अशा विविध कारणांमुळे तुम्हांला होणारा त्रास कमी करु इच्छित असाल तर काही वर्षांतच हे पैसे वसूल होतील. तुमच्या आरामाची आणि मन:शांतीची किंमत पैशांत मोजता येणार नाही, कदाचित ती असे पैसे खर्च करून थोडीफार लाभू शकेल, काय म्हणता?