computer

टिकटॉक सोडा, पण भारताने बंदी घातलेल्या या ५९ पैकी कोणतं ऍप नसल्याने तुम्हांला फरक पडेल?

गेल्या महिन्याभरापासून चीनविरुद्ध देशभरात संताप धुमसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून बायकॉट चायना ट्रेंड देशभरात मोठ्या प्रमाणावर राबवला जातोय. लोकांनी विकत घेतलेल्या चायनीज कंपनीचे टिव्ही फोडले, एवढा हा संताप शिखरावर पोचला आहे.

हा राग चायनीज ऍप्सवरही निघाला. लोकांनी वेचून वेचून चायनीज ऍप्स डिलीट केली. पण या सगळ्यात मुख्य मागणी होती ती म्हणजे चीनच्या मुसक्या स्वतः सरकारने आवळायला हव्या. म्हणजेच सरकारने अधिकृतरित्या चायनीज प्रॉडक्टसवर बंदी आणायला हवी.

सरकारने काल एकाच फटक्यात तब्बल ५९ चायनीज ऍप्सवर बंदी आणली आहे. या ऍप्सबद्दल खूप तक्रारी येत होत्या त्यातली महत्वाची तक्रार म्हणजे या ऍप्सच्यामाध्यमातून खाजगी माहिती चोरली जाते. म्हणूनच सरकारने आयटी ऍक्टमधल्या सेक्शन 69A च्या माध्यमातून या सर्व ऍप्सवर बंदी आणली आहे. या सर्वांचा मोठा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर संभवतो कारण या कंपन्या चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर घालतात आणि त्यांचा मोठा ग्राहकवर्ग हा भारतात आहे.

तर कुठल्या ऍप्सवर बंदी घातली ते बघूया...

1) टिकटॉक
2) शेयरइट
3) kwai
4) युसी ब्राउजर
5) बैडू

6) शेईन
7) क्लॅश ऑफ किंग्ज
8) DU बॅटरी सेवर
9) हॅलो
10) लाइकी

11) युकॅम मेकअप
12) एमआय कम्युनिटी
13) cm ब्राउजर
14) वायरस क्लिनर
15) ऍपस ब्राउजर

16) रोमवे
17) क्लब फॅक्टरी
18) न्यूजडॉग
19) ब्युटी प्लस
20) वी चाट

21) युसी न्यूज
22) QQ मेल
23) वेबो
24) झेंडर
25) QQ म्युजिक

26) QQ न्यूजफीड
27) बिगो लाईव्ह
28) सेल्फीसिटी
29) मेल मास्टर
30) पॅरलल स्पेस

31) Mi व्हिडीओ कॉल
32) वी सिंक
33) ES फाईल एक्सप्लोरर
34) विवा व्हिडीओ
35) मैटू

36) वीगो व्हिडीओ
37) न्यू व्हिडीओ स्टेटस
38) DU रेकॉर्डर
39) वौल्ट
40) cache क्लिनर

41) DU क्लिनर
42) DU ब्राउजर
43) Hago प्ले विथ फ्रेंड्स
44) cam scanner
45) क्लीन मास्टर

46) वंडर कॅमेरा
47) फोटो वंडर
48) QQ प्लेयर
49) वी मिट
50) स्वीट सेल्फी

51) बैडू ट्रान्सलेट
52)विमेट
53) QQ इंटरनॅशनल
54) QQ सिक्युरिटी सेंटर

55) QQ लाँचर
56) यु व्हिडीओ
57) वी फ्लाय व्हिडीओ स्टेटस
58) मोबाईल लेजेंडस
59) DU प्रायव्हसी

तर ही त्या ऍप्सची यादी आहे. पण इथे एक गोची अशी आहे की यातले बरेच ऍप्स हे लोकांच्या नेहमीच्या कामांसाठी वापरातले होते. त्यासाठी पर्यायी भारतीय ऍप्स निर्माण होणे गरजेचे आहे.

उदा. कॅमस्कॅनर. महत्वाची डॉक्युमेंटस स्कॅन आणि अपलोड करण्यासाठी हमखास या ऍपचा वापर केला जात असे. मराठी पीडीएफ स्कॅन केल्यावर त्याचं OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन करून तो मजकूर युनिकोडमध्ये मिळवण्यासाठी तर कॅमस्कॅनर बेस्ट होते.

सहसा जास्तीतजास्त लोकांकडून फटाफट फाईल ट्रान्सफरसाठी शेयर इट, झेंडर आणि ES फाईल एक्सप्लोरर हीच ऍप वापरले जायचे. फाईल ट्रान्सफरसाठी दोन्हीकडे सेम ऍप असणे गरजेचे असते, म्हणून फाईल शेयर करण्यासाठीसुद्धा वेगळा तोडगा काढावा लागेल.

हॅलोसारख्या ऍप्समध्ये भारतीय लोकांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर आहेत.

बॅन केलेल्या प्रत्येक ऍपवर लोक कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. आता यांच्यासाठी पर्याय लवकर निर्माण होणे गरजेचे आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required