बाब्बौ!! सोन्याचा मास्क? कुणी घेतला, किती तोळ्यांचा आणि कितीला पडला?
दुनियादारीमध्ये सिनेमात एक डायलॉग आहे, "हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते." हा डायलॉग सार्थ ठरवणारे बरेच लोक महाराष्ट्रात खूप ठिकाणी दिसतात. त्यातलेच एक नाव म्हणजे पुण्यातले शंकर कुऱ्हाडे!!!
कोरोनाज्वर दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप धारण करत असले तरी आता हळूहळू लोक कोरोनासोबत जगायला शिकत आहेत. बंद पडलेले व्यवसाय सुद्धा पुन्हा सुरू होत आहेत. लोक रोजच्या रोज कामासाठी बाहेर पडू लागले आहेत. बाहेर पडले म्हणजे मास्क गरजेचाच असतो.
पिंपरी चिंचवडचे असलेल्या शंकर कुऱ्हाडे यांच्या अंगावर जवळपास 3 किलो सोने आहे. त्यात चेन, ब्रेसलेट, अंगठी यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. आता अंगावर एवढ्या गोष्टी सोन्याच्या आहेत. अशावेळी 100-200 रुपयांचे मास्क घालून फिरणे शंकररावांच्या प्रतिष्ठेला शोभत नव्हते. तर त्यांनी त्यासाठी काय केले असावे. शेवटी पुणे तिथे काय उणे?
शंकररावांनी थेट सोन्याचा मास्क बनवून घेतला. पुणेकर म्हणजे नाद माणसं!!! शंकररावांनी बनवलेल्या मास्कची किंमत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 2 लाख 89 हजार आहे. शौक बडी चीज है!!!
या मास्कसाठी जवळपास ५५ ग्रॅम सोने वापरले गेले आहे. श्वाशोच्छवास व्यवस्थित करता यावा म्हणून मास्कला छिद्रे सुद्धा पाडण्यात आली आहेत.