computer

प्राण्यांच्या जगातील आश्चर्यकारक आणि अद्भुत अशा १७ गोष्टी !!

काहीतरी विस्मयकारक किंवा अद्भुत असं शोधण्यासाठी तुम्हाला ही पृथ्वी सोडून जायची गरज नाही. कारण या पृथ्वीवरचं जीवनच अद्भुत अशा गोष्टींनी भरलेलं आहे. गरज आहे ती फक्त थोडंसं निरीक्षण करण्याची! निसर्गात सतत उत्क्रांती चालू असते आणि या उत्क्रांतीतल्या बऱ्याचश्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. उदाहरणार्थ प्लॅटिपस नावाचा एक विषारी प्राणी आहे, ज्याला पोटच नसतं! खाल्लेलं अन्न तो कुठे साठवत असेल? हे फक्त एक उदाहरण झालं. अशा अनेक चित्रविचित्र गोष्टींनी प्राणीजगत भरलेलं आहे.

काही प्राणीसंग्रहालयात पर्यटकांना वरती दाखवलेल्या फोटोत दिसत आहेत तसले गॉगल्स दिले जातात! या गॉगल्समुळे माणसं तिरकी बघत आहेत असा भास होतो. याचं कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की काही गोरिलांच्या डोळ्यात जर तुम्ही थेटपणे बघितलं तर ते चिथावले जाऊ शकतात! त्यांना वाटावं की आपल्याला बघायला आलेली माणसं आपल्याकडे बघत नसून तिसरीकडेच बघत आहेत म्हणून हा सगळा खटाटोप! DDB कंपनीने हे असले तिरळी नजर असणारे गॉगल्स तयार केले आहेत. 2००७ मध्ये बोकिटो नावाचा एक गोरिल्ला Rotterdam प्राणीसंग्रहालयातून पळाला आणि त्याने एका माणसावर हल्ला केला. नंतर असं कळलं की तो माणूस त्या गोरीलाच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता! त्यामुळे DDB कंपनीने तिरळे बघणारे गॉगल्स तयार केले आणि त्यांना बोकीटो असं नाव दिलं!

आर्क्टिक हेअर्स हे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठे ससे म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे कान एवढे लहान असतात की ते त्यांच्या एकूण शरीरयष्टीला सूट होत नाहीत! या लहान कानांमुळेच त्यांच्या शरीरातील कमीत कमीत उष्णता बाहेर टाकली जाते आणि आर्क्टिकसारख्या थंड प्रदेशात त्यांचा बचाव होतो.

तुम्हाला मॉस बॉल्स माहीत आहेत? ही एक प्रकारची वनस्पतीच आहे. तर आर्क्टिकवर उगवणारी ही वनस्पती दरवर्षी तिच्या जागेपासून थोड्या अंतराने विस्थापित होत आहे. चार वर्षांच्या निरिक्षणातून असं सिद्ध झालं आहे की हे बॉल्स दररोज सरासरी तब्बल एका इंचाने पुढे सरकतात! विशेष म्हणजे सगळे बॉल्स एका विशिष्ट दिशेनेच पुढे सरकत आहेत! कोणत्या कारणामुळे ते पुढे सरकत आहेत याच उत्तर मात्र कोणाकडे नाही!

Periophthalmus नावाची माशांची अजून एक प्रजाती आहे जी ओहोटीच्या वेळी गाळात जाऊन अन्न शोधते, तसेच ती झाडावर देखील चढू शकते!

Notothenioidei नावाची माशांची एक प्रजात आहे. ती प्रजात अंटार्क्टिकामधल्या बर्फाळ पाण्यात राहते. तिथलं पाणी एवढं थंड आहे की दुसरी कुठलीच माशांची प्रजाती तिथे राहू शकत नाही! अपवाद फक्त Notothenioidei माशांचा, कारण यांच्या रक्तात एक विशिष्ट प्रथिन असतं जे बर्फाळ पाण्यातल्या थंडीशी सामना करतं आणि रक्तात बर्फाचे कण तयार होऊ देत नाही!

मालयातले bar-headed geese म्हणजेच एक प्रकारचे हंसपक्षी २१,१२० फुटापर्यंत उडू शकतात! आणि इतक्या उंच उडत असताना हे हंसपक्षी त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित करू शकतात आणि उंचीनुसार रक्तातील केमिकल्समध्ये बदल घडवून आणू शकतात जेणेकरून एवढ्या उंचीवर उडताना त्यांना कसलाही त्रास होऊ नये!

अलपाईन स्विफ्ट नावाचा पक्षी आकाशात सलग सहा महिने उडू शकतो!

प्रेअरी डॉग्ज जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांचं चुंबन घेतात आणि त्यातून एकमेकांची विचारपूस करतात!

स्टोट नावाचा एक प्राणी आहे. तो नेहमी आपल्या आकारापेक्षा मोठ्या असलेल्या प्राण्याची शिकार करतो आणि आपल्या वजनाच्या एक चतुर्थांश एवढे अन्न दररोज भक्षण करतो!

जपानी संशोधकांनी असा शोध लावला आहे की व्हेल शार्कचे डोळे त्याच्या दातांनी झाकलेले असतात! जवळपास तीन हजार दातांनी त्यांचे डोळे झाकलेले असतात!

डेथ मेटल म्युझिक म्हणून संगीताचा एक प्रकार आहे! थोडा फास्ट आणि कर्णकर्कश असा हा प्रकार आहे. जर तुम्ही पाण्याखाली हे संगीत वाजवलं तर पांढरे शार्क त्याच्याकडे आकर्षित होतात!

तुम्ही कधी मगरीचे दात बघितले आहेत का? ते नेहमी पांढरेशुभ्रच असतात! याच कारण माहिती का? कारण त्यांच्या आयुष्यात त्यांचे दात पन्नास वेळा पडतात आणि पुन्हा उगवतात!!

व्हिडिओ मध्ये जो हालचाल करणारा प्राणी दिसत आहे त्याला ब्रिटल स्टार किंवा Ophiuroidea नावाने ओळखला जातो. तो पन्नास कोटी वर्षांपूर्वी जन्माला आहे! ते 60 सेंटिमीटरपर्यंत वाढू शकतात आणि त्यांच्या प्रत्येक भागाला स्वतंत्र मज्जारज्जू असतो!

या सगळ्या अनोख्या आणि विचित्र प्राणीजगतातील सर्वात विस्मयकारक प्राणी ठरला आहे प्लॅटिपस!

कारण - तो विषारी असतो. त्याला पोट म्हणजेच जठर नसतं! त्याने खाल्लेलं अन्न थेट आतड्यात जमा होतं! त्याच्या तोंडात तर दात असतातच, पण जिथे तो आपले अन्न लपवतो, त्याच्या त्या पिशव्यांमध्ये देखील दात असतात. प्लॅटिपस सस्तन प्राणी असूनही अंडी देतो.

पाण्याखाली तो पूर्णपणे बधीर होऊन जातो. त्याला काहीच दिसत नाही ऐकू येत नाही त्यामुळे त्याच्या त्वचेत अशा पेशी विकसित झाल्या आहेत ज्या त्याला Electroreception करण्यास मदत करतात! Electroreception ही एक अशी क्षमता आहे ज्याद्वारे प्राणी इलेक्ट्रिक फील्ड वापरून आपल्या आजूबाजूच्या वस्तू ओळखू शकतात!

Ghost crabs नावाचे खेकडे आपल्या दातांचा उपयोग त्यांच्या पोटातील जंतूंना भयभीत करण्यासाठी करतात!

बदकांना सर्फ करायला आवडतं, कारण सर्फ करताना त्यांना जास्त शिकार पकडता येते.

हा आहे दक्षिण आशियातल्या नद्यांमधला डॉल्फिन "शुशुक." हा जवळपास आंधळा आहे आणि तो प्रतिध्वनीच्या साहाय्याने भ्रमण करतो!

 

निसर्ग हे जाम गुंतागुंतीचं प्रकरण आहे राव!! जितकं समजून घेण्याचा प्रयत्न करू, तितकं ते अधिक गूढ आणि विस्मयकारक होत जातं!!

 

लेखक : वैभव पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required