computer

नेदरलँडमधले कावळे पर्यावरण स्वच्छ ठेवायला लावताहेत 'चोच'भार!! या स्टार्टअपने नक्की केलंय तरी काय?

नेदरलँड या देशात एक भन्नाट स्टार्टअप आहे. क्राऊडेड सिटीज नावाचं हे स्टार्टअप पर्यावरण रक्षणात मोलाची कामगिरी करत आहे आणि या कामात त्यांनी एक नामी युक्ती योजली आहे.

या लोकांनी चक्क कावळ्यांना एक काम शिकवलं आहे. हे कावळे जिथे कुठे सिगारेटची थोटके पडलेली दिसतील, तिथून उचलून आणतात. ही थोटके मग क्रोबार नावाच्या एका यंत्राच्या माध्यमातून नष्ट करण्यात येतात. या स्टार्टअपची संकल्पनाच अशी आहे की ते कावळ्यांना सिगारेटची थोटके ओळखून, त्यांना उचलण्याचे प्रशिक्षण देऊन, शहरातील चौक किंवा इतर ठिकाणी जिथे कुठे पडले असतील तिथून ते उचलून आणतील.

हे स्टार्टअप नेदरलँडमधले रूबेन व्लेऊतेन आणि बॉब स्पाईकमन हे दोघे चालवतात. एकदा त्यांची भेट जोशुआ क्लेईन नावाच्या व्यक्तीशी झाली. हा माणूस कावळ्यांना नाणी गोळा करायला शिकवत असे. इथेच या दोघांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी 'क्राऊडेड सिटीज' संकल्पनेवर काम सुरू केले.

क्रोबार्क नावाचे हे डिव्हाईस कसे काम करते?

जेव्हा कावळ्यांकडून या यंत्रात थोटके टाकली जातात तेव्हा ते हे क्रोबारक थोटके स्कॅन करून ती खरोखर सिगारेटची थोटके आहेत का हे ओळखते. जर ती थोटके असतील तर मग त्या कावळ्यांना बक्षीस म्हणून या यंत्रातून खायचे पदार्थ दिले जातात. खाऊच्या आमिषाने कावळे देखील जास्तीत जास्त थोटके उचलून आणण्यासाठी प्रयत्न करतात.

एका कावळ्याला बक्षीस मिळाले हे बघून इतर कावळे देखील या कामाला लागतात आणि हे चक्र सुरू होते. कावळे असं कितपत काम करतील असे आपल्याला वाटेल, पण हे कावळे दरवर्षी ४.५ ट्रिलियन थोटके गोळा केली जातात. १ ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी, तर ४.५ ट्रिलियन म्हणजे किती ते आत तुम्हीच पाहा!!

सबस्क्राईब करा

* indicates required