उलगडतंय रेखाचं चरित्र- ’द अनटोल्ड स्टोरी’मधून

गेल्या काही दिवसांपासून जुन्याच चर्चांना वर्तमानपत्रांतून परत एकदा उधाण आलंय. निमित्त आहे अभिनेत्री रेखाच्या चरित्रात्मक पुस्तकाचं.  ’रेखा- द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकातून तिच्या आयुष्याबद्दल आजवर त्यांना उत्सुकता आहे, त्यांना बरीच उत्तरं मिळणारसं दिसतंय. 

प्रत्येक अवॉर्डसच्या कार्यक्रमात रेखाचं असणं आणि आचरट कॅमेरामनने नेहमी रेखा-अमिताभचे लागोपाठ शॉट्स घेणं हे आता आपल्याला सवयीचं झालंय. पण यातून हे ही दिसतं की अजूनही लोकांना इतरांच्या ’प्रकरणांत’ त्यातही अमिताभ-रेखाच्या प्रकरणांत खूप रस आहे. रेखा तिच्या फेसलिफ्टसमुळं अजूनही तशीच तरूण दिसते आणि  बच्चन वृद्ध दिसतो याचेही फोटो मधून्मधून येतच असतात. बच्चन सोडूनही रेखाच्या आयुष्यात बरंच काही घडलंय आणि तिनं ते आजवर लोकांना कळू दिलं नव्हतं. आता या अलटोल्ड स्टोरीच्या माध्यमातून ते लोकांच्या समोर आलं आहे.  

भानुरेखा गणेशन. जेमिनी गणेशनची अनौरस मुलगी. त्यानं तिला गरज होती तेव्हा मुलगी म्हणून स्वीकारलं नाही. लहान वयात शाळा सोडून  पैसे मिळवण्यासाठी आईने तिला सिनेमामध्ये आणलं. काळासावळा रंग, हिंदी न येणारी, थोडी लठ्ठ म्हणून तिला हिणवण्यात आलं. तेव्हाच्या प्रसिद्ध विश्वजीतने सलग पाच मिनिटं चुंबन घेण्यापासून ते तिचं अचानक भांगात कुंकू भरणं आणि  विनोद मेहरासोबतचं लपवलेलं लग्न ते मुकेश अगरवालने डिप्रेशनमध्ये आत्महत्या करण्याच्या सर्व आठवणी या पुस्तकात आहेत. पुस्तक इंग्रजीत आधीच प्रसिद्ध झालंय आणि हिंदी आवृती बाहेर निघण्याआधी सर्व पेपर्स त्या पुस्तकातल्या स्टोरीज सांगून पुस्तकाचं एक प्रकारे मार्केटिंग करत आहेत. 

 

पेपर्समध्ये रेखाला या बॉलीवूडमध्ये लोकांनी किती त्रास दिला, तिची पुर्वायुष्यामुळं बनलेली आणि  धाडसाने मांडलेली सडेतोड मतं  हे वाचलं तर ती खरोखर ग्रेट आहे असं वाटतं. अर्थात, सर्व आत्मचरित्रांना असतो तो  एकांगी चित्रणाचा दोष इथंही नाकारता येत नाही. 

सबस्क्राईब करा

* indicates required