आपले क्रिकेटवीर किती शिकलेयत? बापरे, हे तिघे तर चक्क दहावीपर्यंतच शिकलेयत!
शिक्षणाचं महत्व सगळ्यांच्याच आयुष्यात खूप असतंं. हे मॅचनंतर पाकिस्तानचे खेळाडू प्रेझेंटेशनच्या वेळेस बोलायला आले की आणखी जास्त पटतं!. खरा भारतीय क्रिकेटप्रेमी अशा वेळेस गालातल्या गालात मस्त हसत असतो. हो की नाही? पाकिस्तान जाऊ दे, आपल्या भारतातसुद्धा कधी-कधी लहान वयातच सिनेमा-खेळ चालू केल्यानं आपले काही सेलेब्रिटी आपलं शिक्षणच पुरं करू शकले नाहीत. हो, पण काहीजण चक्क इंजिनिअर आहेत तर काहीजण अर्धवट डॉक्टर आणि एम.बी.ए. आहेत. तर पाहूयात आज, कोण किती शिकलंय ते!!
इंजिनिअर्स!!
के. श्रीकांत- इलेक्ट्रिकल इंजिनिअर, अनिल कुंबळे- मेकॅनिकल इंजिनिअर, जवागल श्रीनाथ - इन्स्टृमेंटेशन टेक्नॉलॉजी, आर. अश्विन - इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी!! आपली क्रिकेट टीम तगडी आहे राव!! आपल्या झहीरखाननेसुद्धा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली होती पण त्याची डीग्री काही पूर्ण होऊ शकली नाही..
खरंतर आपल्या टीममध्ये इंजिनिअर्स सोबत एक डॉक्टरही असू शकला असता. पण व्हीव्हीएस लक्ष्मणचं एम. बी. बी. एस. खेळामुळं पूर्ण होऊ शकलं नाही ना!!
आजन्म बॅचलर्स
हैदराबादेत जन्मलेल्या अ्झरूद्दिनने उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या निझाम कॉलेजमधून बी. कॉम. पूर्ण केलंय. झालंच तर विरेंदर सेहवाग आणि बंगाल टायगर सौरव दादानेही बी. कॉम.पर्यंतचं शिक्षण घेतलंय. गांगुलीला नंतर ऑनररी पी. एच. डी देण्यातआली. आपल्या ’सनी’ गावस्करनेसुद्धा मुंबईच्या सेंट झेविअर्समधून डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलंय.
राहुल द्रविड-म्हणजेच भारताची भक्कम भिंत. त्यालाही बॅचलरच म्हणावं लागेल. त्याने बंगळुरूमध्ये असताना बी. कॉम. केलं आणि एम. बी. ए. करत असताना त्याची इंडियन क्रिकेट टीममध्ये निवड झाली.
आम्ही ’बारावी’कर..
धोनीने बारावीनंतर शिकायचा प्रयत्न केला, पण क्रिकेटच्या प्रॅक्टिसमुळे अभ्यासाला वेळच मिळायचा नाही. त्यामुळं तो तीनदा नापास झाल्याचं इंटरनेटवर लिहिलं गेलं आहे. बाकीचे आपले सुपरस्टार्स म्हणजेच विराट कोहली, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर , रोहित शर्मा या सर्वांनी बारावीनंतर खेळाकडे पूर्ण लक्ष देऊन कॉलेजला रामराम ठोकला.
दहावी फ
कपिल देव का जवाब नहीं, असं आपण फक्त त्याच्याबद्दल क्रिकेटमध्ये म्हणू शकतो. कपिल देवचं नक्की किती शिक्षण झालंय याची माहिती जालावर उपलब्ध नसली तरी त्याचं जास्तीत जास्त हायस्कूलपर्यंत शिक्षण झालं आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या भाषणांत आपण शिकण्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्याने व्यक्त केलीय.
इशांत शर्मा, अजिंक्य राहाणे यांनी दहावीनंतर शाळा सोडून दिली, त्यामुळे हे दोघेही पुढे काही शिकले नाहीत.