computer

पठाण आणि पांड्या बंधूंमधलं अविश्वसनीय साम्य!! या चौघांमधलं आणखी कोणतं साम्य तुम्हाला ठाऊक आहे?

कधीकाळी भारताच्या क्रिकेट संघात इरफान आणि युसूफ या पठाण बंधूनी मोठे योगदान दिले होते. अनेक वेळा मोक्याच्या क्षणी सामना सावरण्याचे काम या भावंडांनी केले आहे. सध्या हेच काम हार्दिक आणि कृणाल हे दोन्ही पांड्या बंधु करत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे पांड्या बंधू आणि पठाण बंधू यांच्यात अनेक गोष्टींचे साम्य आहे.

पठाण आणि पांड्या दोन्ही बंधू हे बडोदा या शहरातून येतात. बडोदा शहरात राहूनच त्यांचे क्रिकेट बहरले आहे. एकाच शहरात हे दोन्ही भावंडे लहानाचे मोठे झालेले आहेत. पठाण आणि पांड्यांमध्ये असलेले साम्य म्हणजे पठाण बंधूंमधील दोन्ही बंधू हे ऑल राऊंडर आहेत तर पांड्या बंधू देखील ऑल राऊंडर आहेत.

देशाला गरज असेल तेव्हा बॅटिंग आणि गरज असेल तेव्हा बॉलिंग करून चांगली कामगिरी करून दाखवण्याची कामगिरी पठाण आणि पांड्या बंधू करून दाखवत असतात. त्याचप्रमाणे एक उजव्या हाताने खेळतो तर दुसरा डाव्याने हाताने खेळतो, हे अजूनच एक साम्य पांड्या आणि पठाण बंधूंमध्ये आहे.

याच यादीतील पुढील मुद्दा म्हणजे जेव्हा बॉलिंगचा विषय येतो तेव्हा मोठा हा स्पिनर आहे, तर लहान फास्ट बॉलिंग करतो. युसूफ पठाण हा मोठा भाऊ स्पिनर आहे, तर लहान इरफान फास्ट बॉलर आहे. त्याचप्रमाणे मोठा कृणाल पांड्या स्पिनर असून लहान हार्दिक हा फास्ट बॉलर आहे.

याच सर्व योगायोगांबरोबरच सर्वात मोठा योगायोग म्हणजे ज्याप्रमाणे युसूफ पठाण मोठा असून देखील त्याची निवड इरफान पठाण नंतर झाली. त्याचप्रमाणे कृणाल पांड्या मोठा असून देखील भारतीय संघात हार्दिकचा समावेश आधी झाला.

हे सर्व योगायोग बघितले तर विशेष वाटल्याशिवाय राहत नाही. कधीकाळी मोहिंदर अमरनाथ आणि सुरेंदर अमरनाथ या भावंडांनी देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

तुम्हाला यापैकी कोणती जोडी आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required