computer

ANIMAL KINGDOM: प्राण्यांची अत्यंत सजीव वाटणारी पोट्रेट्स....या प्राण्यांना काय म्हणायचं आहे??

पोट्रेट म्हणजे तैलचित्र, रेखाटन किंवा छायाचित्र. चित्रकलेच्या या प्रकारात वस्तू अगर व्यक्तींचे डोळे, ओठ, हात, त्यांचे सौंदर्य, निरागसता,  यासारखे भाव टिपून त्याचं चित्र  उभं केलं जातं. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्रतिमेतून साधलेले व्यक्तिचित्र! व्यक्तिचित्रण शब्दात करायचे झाले तर पाच -दहा हजार शब्द लागतात, पण हे एकाच प्रतिमेतून जेव्हा समोर ठेवले जाते तेव्हा त्याला म्हणायचे पोर्ट्रेट ! ही पोट्रेट्स आपण आपल्या घरांमधून सजवतो.

पण तुम्हास माहिती आहे का? की प्रत्येक पोट्रेट किंवा छायाचित्र एक कहाणी सांगते. त्यांचेही एक जग असते. या जगात त्यांची गोष्ट लपलेली असते.

"माणसांचे अशा पोट्रेटमधील हावभाव, त्यामागील कहाणी आपण समजू शकतो पण हीच पोट्रेट प्राण्यांची असतील तर? आणि तेही त्यांच्या नैसर्गिक भावनेने वागत असताना किंवा त्यांच्या ‘मुडस्’नुसार वागताना कँमेरात कैद केले असेल तर? किती आणि कोणकोणते मुडस बघायला मिळतील. त्यांच्या मनातले भाव नकळत त्यांच्या चेहऱ्यावर वाचता येतील आणि त्यांच्याही राज्यातल्या कहाण्या ही पोट्रेटस आपल्याला सांगतील". हे उद्गार आहेत रँडल फोर्ड या वन्यजीवन-छायाचित्रकाराच्या 'ANIMAL KINGDOM' या पोट्रेट-बुक बद्दल.

या पुस्तकात त्याने काळ्या पांढऱ्या प्रकाशयोजनेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्राण्यांचे अनेक मूडस् आपल्या कँमेरात कैद केले आहेत. 'ANIMAL KINGDOM' मधील छायाचित्रे इतकी रेखीव, सजीव आणि आकर्षक आहेत की ती आपली नजर खिळवून ठेवतात. निसर्गाच्या शाळेतील सारे हौशे, नवशे, गवशे फोर्डने आपल्या कँमेरात पकडले आहेत. तेही त्यांना त्यांच्या नैसर्गीक हावभावांसकट.

त्यामध्ये खट्याळ, खोडकर चिंपांझी असतो नाहीतर चेहऱ्यावरचा गर्व दाखवणारा बंगाली वाघ किंवा ऑक्झी-बुल नाहीतर चुलबुली, गप्पा मारणारी बदके, आपली शिंगे अभिमानाने वागवणारा बारसिंघा देखील फोर्डच्या पोट्रेट-बुक मध्ये आपल्याला सापडतात.

या प्रत्येक पोट्रेटला काळ्या पांढऱ्या रंगाची पार्श्वभूमी असल्याने प्रत्येक प्राण्याचे हावभाव उठून दिसतात.  फोर्डचा असा विश्वास आहे की प्रत्येक प्राण्याकडे सांगण्यासाठी त्याची स्वतःची अशी कहाणी असते. हाच दृष्टिकोन ANIMAL KINGDOM  ही छायाचित्र शृंखला साकारण्याच्या मुळाशी होता. ही नजर खिळवून ठेवणारी शृंखला प्राण्यांची स्वभाववैशिष्ट्ये आणि त्यांचे वेगळेपण आपल्याला दाखवते.

फोर्डला म्हणतो, " ही पोट्रेटस केवळ आपल्याला त्यातील सौंदर्याचा आस्वाद घ्यायला लावतात असे नाही तर त्यातील निखळ भावनाही आपल्याला आकर्षित करतात. व्यक्त होण्यास भाग पाडतात." फोर्डची हीच भावना त्याने छायांकीत केलेल्या प्राण्यांच्या हावभाव आणि त्यांच्या फोटोसाठी दिलेल्या पोजमध्ये दिसते.

चला तर आज काही मोजक्या पोर्ट्रेट मधून या प्राण्यांना काय म्हणयचं आहे याचा अंदाज घेऊ या !

आता करणार तरी काय या लॉकडाऊनमध्ये !!

सुंदरा मनामध्ये भरली !!

बाबा कडकनाथ की जय हो!

मी अकेला, मोगलीचा खास !

बघीरा, बस नाम काफी है!

शेरखान !

आज काय फॉरवर्ड करायचं ?

लेखिका: मानसी चिटणीस

सबस्क्राईब करा

* indicates required