आता वानखेडे स्टेडियमचे नाव बदलणार..
भारताच्या 2011 वर्ल्डकप विजयस्थल असलेल्या वानखेडे स्टेडियमचा आता नामविस्तार होणार आहे. साधारण 40 वर्ष जुन्या असलेल्या ह्या स्टेडियमला तत्कालीन बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष एस. के. वानखेडे यांचे नाव देण्यात आलं होतं. पण आता मुंबई क्रिकेट असोसेशियन आणि डी. डी. बी. मुंद्रा या कंपन्यांतला करार पूर्ण झाला तर वानखेडे स्टेडियमचे नाव बदललं जाईल.
नव्या करारानुसार वानखेडे हे नाव काढून न टाकता त्याचा मागे किंवा पुढे एका स्पॉन्सरचे नाव जोडण्यात येईल. जगभरात हि कल्पना अनेक स्पोर्ट्स स्टेडियम साठी वापरण्यात आली आहे. क्रिकेटचं उदाहरण द्यायचं झालं तर इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमने हि पद्धत स्वीकारली आहे. आज या स्टेडियमची ओळख किया ओव्हल अशी आहे.