अगदी सहज ओळखा दहा रूपयाचं नकली नाणं..
रिझर्व्ह बँकेनं काही वर्षांपासून दहा रूपयांची नाणी चलनात आणली आहेत. पण आजकाल जो तो ही नाणी स्विकारायला नकारच देतोय. एक तर बाजारात दहाची नकली नाणी फिरत आहेत. आणि दुसरीकडे ही अफवा पसरली आहे की ही दहाची नाणी रिझर्व्ह बँकेने आता बंद केली आहेत.
या सगळ्या गोंधळात ज्यांच्याकडे दहा रूपयांची नाणी आहेत त्यांची चांगलीच पंचाईत होत असेल. पण डोन्ट वरी.. रिझर्व्ह बँकेने कोणतीही नाणी बंद केलेली नाहीत. आणि जर तुम्हाला दहाच्या नकली आणि असली नाण्यातला फरक ओळखायचा असेल तर नाण्यावर बघा...
ज्या नाण्यावर रूपयाचे चिन्ह (₹) आणि १० या आकड्याच्या डोक्यावर १० रेषा आहेत ते नाणं आहे अगदी असली. याउलट नकली नाण्यावर रुपयाचं चिन्ह नाही. आणि १० आकड्याच्या वरच्या बाजूला १५ रेषा आहेत. दहाची असली आणि नकली नाणी ओळखायचा हा अगदी सोपा उपाय आहे. तेंव्हा लवकर हा लेख शेअर करा...