computer

स्पॅम इमेल चेक केले नसते तर ही बाई २२ कोटींच्या लॉटरीला मुकली असती!!

लॉटरी हा शब्द म्हणला की डोळे चमकतात? कोणाला नको असतात, काही कष्ट न करता मिळालेले पैसे? पण हा नशिबाचा खेळ जे लोकं खेळतात त्यांच्या सर्वांच्याच नशिबात लॉटरी लागतेच असं नाही. पण आज आम्ही अश्या महिलेचा किस्सा सांगणार आहोत जिचे आयुष्य लॉटरी मुळे एका रात्रीत बदलून गेले. ती चक्क २२ कोटी रुपयांची मालकीण झाली. ऑकलंडमध्ये राहणाऱ्या लॉरा स्पियरच्या बाबतीत हे घडले आहे. तिच्या मेलबॉक्समध्ये आलेला स्पॅम मेल तिने पाहिला, तेव्हा तिला ती श्रीमंत झाल्याचे कळाले.

वाचल्यावर खरोखर विश्वास बसणार नाही पण हे प्रत्यक्षात लॉरासोबत घडले आहे. लॉरा तिचे जुने मेल पाहण्यासाठी मेलबॉक्समधील स्पॅम फोल्डर पाहत होती. तेव्हा तिचे लक्ष एका इमेलवर गेले. त्या इमेलमध्ये ती लॉटरी जिंकली असल्याचे लिहिले होते .२२ करोड रुपयांचे बक्षिस तिने लॉटरीमध्ये जिंकले होते. तिला आधी तो फेक इमेल वाटला.

स्पॅममध्ये आलेले इमेल तसे उघडले जात नाहीत. एकतर त्यात व्हायरस असतात किंवा फसवणुकीसाठी एखादे आमिष दाखवले जाणारे इमेल्स असतात. म्हणून लॉराने दुर्लक्ष करायचे ठरवले. नंतर तिला आठवले की तिने ३१ डिसेंबरच्या मेगा मिलियनमध्ये भाग घेतला होता. यावेळी मिशिगन लॉटरी डॉट कॉमवरुन तिने एक तिकीट खरेदी केले होते. मग तिने तो मेल नीट वाचला आणि तिच्या लक्षात आले आणि ३ मिलियन डॉलर म्हणजेच २२ कोटी रुपयांची लॉटरी तिने जिंकली आहे. नुसत्या मेलवर विश्वास ठेवायला नको म्हणून तिने कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यासंबंधीची अधिक माहिती वाचली. कंपनीच्या वेबसाईटवरही तिला तिचे नाव दिसले तेव्हा तिला खात्री पटली. त्यानंतर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने ही बातमी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली. त्यावेळी सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या.

एका स्पॅममेलने तिला करोडपती बनवले. मेगा मिलियन ही स्पर्धा २००२ मध्ये सुरू झाली होती. ४५ राज्यांमध्ये मेगा मिलियन्स लॉटरीच्या तिकिटांची किंमत दोन डॉलर आहे. मेगा मिलियन्स लॉटरी मेगा बक्षीस जिंकण्याची शक्यता ३०२,५७५,३५० पैकी एक आहे . यामध्ये तिकिटावरचे सर्व म्हणजे सहाच्या सहा क्रमांक जुळावे लागतात. यात जिंकणे अवघड होण्यासाठी अनेक वर्षांमध्ये नियम बदलले आहेत. त्यामुळे जर कोणी जिंकले तर तो मोठा जॅकपॉट्च मानला जातो. ॲरिझोनामधील एका कुटुंबाने ऑक्टोबर २०२१ मध्ये शेवटचा मेगा मिलियन्स जॅकपॉट $१०८ मिलियन जिंकला होता.

लॉरा सध्या विजयाचा आनंद घेत आहे. इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी आपल्याला लागेल याची जराही कल्पना नसल्याने ती सुखद धक्यात आहे. यातून असेच वाटते,एखादा मेल डिलिट करण्याआधी नीट तपासून पहावा ना?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required