computer

सहज सोपे अर्थसूत्र:बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय ?

मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण अंगिकारण्याआधी आपल्याकडे ‘परमिट राज' होते. त्यावेळी नवा उद्योग सुरू करण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेली उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागत असे. साहजिकच नवे उद्योग सुरू करण्यासाठी उद्योगसमूह एकमेकांवर कुरघोडी करत असत आणि ज्याचे, भल्याबुऱ्या मार्गाने, परमिट मिळत असे, ते उद्योग सुरू करत असत. परमिटनुसार ठरावीक ठिकाणी, ठरावीक उत्पादनक्षमतेचा आणि विशिष्ट उत्पादनांचा उद्योग सुरू करावा लागत असे. कारखान्याची जागा ठरवताना परमिट देणारे तेथे कच्चा माल उपलब्ध आहे की नाही, वाहतुकीची सोय आहे की नाही हे विचारात घेत नसत, शिवाय उत्पादनक्षमता ठरवताना ती किती असणे आर्थिकदृष्ट्या योग्य असेल; याचाही विचार करत नसत. याचा परिणाम असा झाला, की उद्योगसमूहांनी असे उद्योग सुरू केले, ज्यांचा त्यांच्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांशी दुरान्वयानेसुद्धा संबंध नव्हता किंवा ज्यासाठी आवश्यक असणारे तज्ज्ञ (एक्सपर्ट) त्यांच्याकडे नसत. अशाही परिस्थितीत ते उद्योग नफ्यात चालत. कारण एक तर स्पर्धा नसे किंवा अल्प प्रमाणात असे.

मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर आपल्या देशाच्या उद्योगविषयक परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. ज्याला शक्य आहे, तो उत्पादनाचा, वाटेल तेथे,वाटेल त्या क्षमतेचा उद्योग सुरू करू लागला. जेथे परदेशी उद्योगांना येण्यास बंदी होते, तिथे फॉरीन कोलॅबोरेशन सर्रास होऊ लागले. साहजिकच स्पर्धा वाढली. स्थानिकच नाही तर आंतरराष्ट्रीय उद्योगांशीसुद्धा, शिवाय ही स्पर्धा केवळ उत्पादनाच्या विक्रीबाबतच होती असे नाही, तर कच्च्या मालासाठीसुद्धा होती.
पूर्वी कच्चा माल विकत घेणारे, कच्चा माल उत्पादकांवर आपल्याला फायद्याच्याअटी टाकत असत. आता कच्चा माल मिळावा यासाठी त्यांना एकमेकांशी स्पर्धाकरणे भाग पडले. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादनाचा दर्जा सुधारणे, आपली कार्यकुशलता वाढवणे भाग पडले आणि ह्यासाठी जे उपाय उद्योगांनी केले, त्यात बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन हे होतं.

बँकवर्ड इंटिग्रेशन:


जेव्हा एखादा उद्योग, त्याला कच्च्या मालाचा पुरवठा करणारा उद्योग विकत घेतो,तेव्हा त्याने बॅकवर्ड इंटिग्रेशन केले आहे असे म्हटले जाते. रबराची उत्पादने बनवणारीकंपनी जेव्हा रबराचे मळे असणारी कंपनी विकत घेते किंवा तयार कपडे बनवणारीकंपनी कापडाची मिल विकत घेते, तेव्हा ते बॅकवर्ड इंटिग्रेशन असते.कच्च्या मालाचा खर्च हा उत्पादन खर्चाचा नेहमीच एक मोठा हिस्सा असतो. त्यावर नियंत्रण मिळवल्याने उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.

फॉरवर्ड इंटिग्रेशन

जेव्हा एखादा उद्योग आपला तयार माल वापरून अन्य उत्पादन तयार करणारा उद्योग विकत घेतो, तेव्हा त्याने फॉरवर्ड इंटिग्रेशन केले असे म्हटले जाते. जेव्हा एखादीकापड गिरणी तयार कपडे बनवणारी कंपनी विकत घेते रबराचे मळे असणारी कंपनीरबराची उत्पादने बनवणारी कंपनी विकत घेते, तेव्हा तिने फॉरवर्ड इंटिग्रेशन केले आहेअसे म्हटले जाते.
बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन करणारे उद्योग, अनुक्रमे आपल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर आणि आपल्या उत्पादनाच्या विक्रीवर नियंत्रण मिळवतात. फॉरवर्ड इंटिग्रेशन करणाऱ्या कंपनीला अन्य कोणावर आपल्या मालाच्या विक्रीसाठी अवलंबून रहावे लागत नाही तर बॅकवर्ड इंटिग्रेशन करणाऱ्या कंपनीला कच्च्या मालाची अनिश्चितता राहत नाही. विकास आणि समन्वय प्राप्त करण्यासाठी जी धोरणे कंपन्या अवलंबतात, त्याचा एक भाग म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन होय.

सबस्क्राईब करा

* indicates required