बूमरँगचा इतिहास काय आहे? फेकल्यावर ते परत का येते?
जंगल बुक आणि मोगली पाहिला असेल तर तुम्हाला मोगलीकडचे खेळणे होतेही आठवत असेल. हे खेळणे हवेत फेकले की मागे वळून परत हातात यायचे. हे खेळणे खरे आहे, का फक्त कार्टून मध्ये दाखवतात अस मुलांना प्रश्न पडायचा. पण नंतर कळले की या खेळण्याला बूमरँग म्हणतात. हे खेळणे एका पद्धतीने फेकल्यावर परत माघारी येते. आज आपण बघूयात, बूमरॅंग काम कसे करते?
बूमरॅंग हे आपल्याला आज एक खेळणे म्हणून जरी माहित असले तरी प्राचीन काळात ते शस्त्र म्हणून वापरले जात असे. बूमरॅंगचा शोध ऑस्ट्रेलियातील आदिवासींनी लावला होता. आदिवासींनी त्याचा उपयोग मनोरंजन, शिकार आणि युद्धासाठी केला. जगातील सर्वात जुने बूमरँग पोलंडच्या कार्पेथियन पर्वतांमध्ये सापडले होते. हे बूमरँग सुमारे २०,००० हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते. १४ व्या शतकातील राजा तुतेनखामेन यांच्याकडे अनेक प्रकारच्या बूमरॅंग्सचा संग्रह होता.
प्राचीन काळी बूमरँग लाकडापासून आणि प्राण्यांच्या शिंगांपासून बनवले जात होते. आजकाल लाकडाव्यतिरिक्त प्लास्टिक, रबर आणि धातूपासून बनवलेले बूमरँग बाजारात उपलब्ध आहेत. आजकाल तर बूमरँग ऑनलाइन ही सहज मिळतात.
बुमरँग खेळण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. नाहीतर ते परत माघारी येत नाही. आपल्या हातात घेऊन ते उभ्याने धरून फेकले तर ते परत येते. जर ते आडवे धरून फेकले तर चुकीचे उडते. फक्त उभे धरले आणि सुमारे ४५ अंशांचा कोन बनवून फेकले तर अचूक म्हणता येईल. अर्थात, यासाठी तुम्हाला सरावाची गरज असते. सरावाने समजून जाईल आणि काही तासांत तुम्हाला ते खेळता येईल.
आता पाहूयात ते माघारी का येते?
हवेत फेकल्यावर, बूमरँगचा एक पंख दुसऱ्यापेक्षा वेगाने फिरतो. वेगवान फिरणारी विंग इतर पंखांपेक्षा जास्त लिफ्ट फोर्स वापरते. दोन्ही पंखांवरील शक्तीचे हे असंतुलन अपरिवर्तनीय टॉर्क निर्माण करते आणि ते बूमरॅंगची दिशा बदलते. परिणामी ते गोल फिरते आणि परत फेकल्याच्या ठिकाणी येते. याला विज्ञानाच्या भाषेत Gyroscopic Precession असे म्हणतात..
बूमरँगने खेळताना खुल्या मैदानात खेळायची खबरदारी मात्र नक्की घ्या. तुम्हाला लेख आवडला असेल तर तो शेअर करा.
शीतल दरंदळे