computer

बॉडीगार्ड ते व्हिलन! KGF-2 च्या खलनायक राजूचं अचानक पूर्ण करिअरच बदललं!! पूर्ण गोष्ट तर जाणून घ्या..

सगळेचजण आपल्या कर्मचाऱ्यांना आदराने-प्रेमाने वागवतात असे नाही. त्यामुळे असे काही घडले की त्याची लगेच बातमी होते. मालक अतिश्रीमंत असेल तर व्हायरलही होते. सलमान खानने त्याच्या बॉडीगार्ड या सिनेमात त्याचा खऱ्या आयुष्यातील बॉडीगार्ड शेरा याला छोटासा रोल देऊ केला होता. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती.

सध्या अभिनेता यश याचा केजीएफ 2 बॉक्सऑफिसवर अक्षरशः धिंगाणा घालत आहे. केजीएफ सिरीजमधील दोन्ही सिनेमांनी बॉलिवूडचे मार्केट खाऊन टाकले आहे. यातला हिरो यश जितका भाव खाऊन जातो तितकाच यातला व्हिलन गरुडा आणि अधिरा हे भाव खाऊन जातात. सिनेमात अधिराची भूमिका करणारा संजय दत्त हा कसलेला अभिनेता होता. पण गरूडा कोणी अभिनेता नाही,तर यशचा पर्सनल बॉडीगार्ड आहे.

केजीएफसारख्या अतिमहत्त्वाच्या सिनेमासाठी मेन व्हिलनचा रोल ज्याला ऍक्टिंगचा गंध नाही अशा स्वतःच्या बॉडीगार्डला देणे हा मोठा धोका होता आणि तो यशने आपल्या बॉडीगार्डच्या प्रेमापोटी पत्करला. रामचंद्र राजू हे त्या बॉडीगार्डचे नाव आहे. गरुडा या व्हिलनच्या क्रूर लूकसाठी राजू पूर्णपणे फिट बसला आणि पुढे इतिहास घडला.

प्रशांत निल हे केजीएफचे डायरेक्टर जेव्हा यशच्या घरी त्याला सिनेमाची स्क्रिप्ट सांगण्यासाठी गेले होते, तेव्हा तिथे उपस्थित असलेला राजू हा प्रशांतला इम्प्रेस करून गेला. यशसोबत बोलणे करून राजूला या सिनेमासाठी घ्यायचे ठरवले. राजूला कुठलीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना त्याने ज्याप्रकारे हा रोल ताकदीने पेलला त्यावरून तो लंबी रेस का घोडा आहे हे सिद्ध झाले.

केजीएफ आणि गरुडा दोन्ही जगभर गाजल्यावर राजूचे करियर जोर धरू लागले. त्याला तमिळ सिनेमा सुलतानसाठी मेन व्हिलनचा रोल देण्यात आला. त्यानंतर कन्नड सिनेमा रायडर आणि मधागजा यांच्यात त्याने काम केले. सध्या तो तमिळ सिनेमा जण गन मन आणि स्थबम 2 मध्ये मध्ये काम करत आहे.

फक्त एक संधी मिळाली आणि राजूचे करिअरच बदलले. बॉडीगार्ड म्हणून काम करणारा राजू साऊथ सिनेमा गाजवू लागला. पुढे मागे कदाचित तो आपल्याला बॉलिवूडमध्येही दिसेल. रामचंद्र राजूची ही गोष्ट खरंतर यश आणि त्याचे प्रेमळ संबंध, त्यातून त्याला मिळालेली संधी यामुळे त्याचे बदललेले जग याअर्थाने एखाद्या सिनेमाची स्टोरी ठरू शकते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required