computer

प्राण्यांवर देखील बलात्कार करण्याची विकृती येते तरी कुठून?

पूर्वीपासूनच समाजात स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार होत आहेत. अनेक विकृत आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी स्त्रियांना शिकार करतात पण समाजातील काही विकृतांनी तर आता कळस गाठला आहे. आता प्राण्यांवर बलात्काराच्या काही घटना समोर येत आहेत. काही वर्षांपूर्वी एका वयस्क व्यक्तीने कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. अशीच एक घटना सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामधील चांदोली अभयारण्यामध्ये घडली आहे. या घटनेमध्य कुत्र्यावर नाही तर चक्क एका घोरपडीवर बलात्कार झाल्याचे समोर येत आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान ३०० चौरस किलोमीटर (३०००० हेक्टर) पेक्षा जास्त पसरलेले आहे. यामध्ये वाघ आणि पँथरपासून ते सरपटणारे प्राणी जसे की मॉनिटर सरडे आणि गेकोपर्यंतचे वन्यजीव आहेत. या प्रकल्पात वाघांची संख्या मोजण्यासाठी अनेक ठिकाणी कॅमेरे लावले जातात. त्या कॅमेरांचे निरीक्षण करून वाघांची संख्या ठरवली जाते. काही वेळा अशा कॅमेरांमध्ये अवैधरीत्या जंगलात फिरणारे तस्कर देखील कैद होत असतात. नुकतेच वनक्षेत्रातून हे कॅमेरे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरु होती. २७-२८ मार्च च्या सुमारास जेव्हा काही पथके या कॅमेरांची तपासणी करत होती तेव्हा त्यांना अस दिसलं की, वनसंरक्षित क्षेत्रात काही लोकांनी घुसखोरी केली आहे. पहिल्यांदा त्यांना अस वाटल की, हे चारही जण अवैध शिकारीसाठी सशस्त्र आले असावेत. म्हणून अधिकार्यांनी अधिक तपास करून त्या चारही जणांना अटक केली. पण तपासात पुढे अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. 
संदीप पवार, मंगेश कामतेकर, अक्षय कामतेकर आणि रमेश घाग हे चौघे २० ते ३० वर्ष वयाच्या गटातील तरुण शिकारीच्या उद्देशाने चांदोली अभयारण्यामध्ये रात्रीच्या सुमारास वनसंरक्षित क्षेत्रात घुसले. ते या आधीदेखील असे चोरट्या शिकारीच्या उद्देशाने जंगलात घुसले होते. पण जंगलात असे कॅमेरे कुठे लावले आहेत याची त्यांना कल्पना नसावी. कॅमेरामध्ये मिळालेल्या फोटो च्या आधारावर पोलिसांनी ५ एप्रिलला या चौघांना अटक केली. पहिल्यांदा पोलिसांना वाटले हे चोरट्या शिकारीचे प्रकरण असावे. पण जेव्हा पोलिसांनी त्या चौघांचे मोबाईल तपासले तेव्हा त्यांना देखील धक्का बसला. इतक विकृत खरच कुणी असू शकत का? त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांनी शिकार केलेल्या ससे, साळींदर, पिसुरी हरण असे अनेक फोटो होते त्याच बरोबर काही व्हिडीओ दिखील होते. जेव्हा वनाधिकार्यांनी ते व्हिडिओ पहिले तव्हा त्यांना देखील या राक्षसांचे काय करावे सुचेना. त्या व्हिडीओमध्ये तिघाजणांनी एका घोरपडीवर बलात्कार करतानाच्या क्लिप्स होत्या. एव्हडेच नाही तर त्या घोरपडीवर अत्याचार केल्यानंतर त्यांनी तिला मारून तिचे मांस शिजवून खाल्ले. या प्रकरणात पोलिसांनी चौघांवीरुध्ह आयपीसी कलम ३७७ (अनैसर्गिक गुन्हे), वनसंरक्षण कायदा १९७२ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. 

भारतातील मॉनिटर सरडे धोक्यात आहेत आणि कायद्याने संरक्षित प्रजाती आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. वाइल्डलाइफ अॅडव्होकसी ग्रुप्सच्या अहवालात 2010 ते 2020 दरम्यान भारतात प्राण्यांवर लैंगिक अत्याचाराची 82 प्रकरणे नोंदवली गेली. प्राण्यांशी संबंधित असलेल्या एकूण 500,000 प्रकरणांपैकी हे प्रकरण होते. देशातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत त्यातीलच वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार अनेक प्राणी प्रजातींच्या शिकारीवर बंदी आहे. या कायद्यानुसार अवैध्यरीत्या शिकार आणि तस्करी साठी सात वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पण आज वन्यजीव संरक्षण कायदे अजून कठोर करण्याची वेळ आली आहे.

 

प्रकरण गंभीर नक्कीच आहे. माणूस खरच इतक्या टोकाचा विकृत झाला आहे का? प्राण्यांवर देखील बलात्कार करण्या एव्हडी विकृती येते तरी कुठून? त्या बिचार्या मुक्या जनावारंचे हाल करण्याचा हक्क दिला कुणी यांना? असे अनेक प्रश्न मनात येतात. अशा लोकांना मानसिक रोगी ठरवून उपचारांसाठी दवाखान्यात पाठवलं जात, पण त्यानंतर त्यांची सुटका होते आणि पुन्हा असेच गुन्हे करण्यासाठी ते मोकळे सुटतात. आज हे चारही आरोपी जामिनावारती बाहेर समाजात मोकळे फिरत आहेत. काही दिवसात लोक देखील हे प्रकरण विसरून जातील. कदाचित हे चौघे पुन्हा चोरट्या शिकारी आणि प्राण्यांवर अत्याचार करायला सुरु करतील, कदाचित मोकळे सुटल्याने त्यांची हिम्मत अजून वाढेल... मग? मग काय होईल? एखाद्या चिमुकलीला किंवा एखाद्या स्त्री ला आपली शिकार केल्याशिवाय हे राहणार नाहीत. तेव्हा जबाबदार कोण असेल?

सबस्क्राईब करा

* indicates required